खालगाव-जाकादेवी बाजारपेठ तीन दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:30 IST2021-04-10T04:30:33+5:302021-04-10T04:30:33+5:30
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव-जाकादेवी बाजारपेठ बंद ठेवल्याने शुकशुकाट पसरला हाेता. लाेकमत न्यूज नेटवर्क जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील खालगाव ग्रामपंचायतीने कोरोना ...

खालगाव-जाकादेवी बाजारपेठ तीन दिवस बंद
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव-जाकादेवी बाजारपेठ बंद ठेवल्याने शुकशुकाट पसरला हाेता.
लाेकमत न्यूज नेटवर्क
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील खालगाव ग्रामपंचायतीने कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या आवाहनानुसार खालगावातील जाकादेवी बाजारपेठ शुक्रवारी अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णतः बंद ठेवण्यात आली. १२ एप्रिलपर्यंत आणखी सलग तीन दिवस जाकादेवी बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती खालगावचे विद्यमान सरपंच प्रकाश खोल्ये व उपसरपंच कैलास खेडेकर यांनी दिली.
शुक्रवारी शासकीय व अत्यावश्यक सेवा वगळून जाकादेवीतील सुमारे १३०पेक्षा जास्त विक्रेते-तसेच छोटे-मोठे व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवली. खालगाव ग्रामपंचायतीने केलेल्या सूचनेनुसार आणखी तीन दिवस जाकादेवी बाजारपेठ अशाच प्रकारे बंद ठेवण्यात येणार आहे. शासकीय व वैद्यकीय सेवा, अत्यावश्यक सेवा वगळता या बंदला व्यापारी व ग्रामस्थांनी १०० टक्के प्रतिसाद दिल्याबद्दल सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष मधुकर रामगडे यांनी व्यापारी व ग्राहकांना धन्यवाद दिले. कोरोनाचा संसर्ग आपल्या परिसरात वाढू नये, सुरक्षिततेसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन खालगाव ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.