काशिराम तांबे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST2021-06-22T04:21:29+5:302021-06-22T04:21:29+5:30

काशिराम तांबे खेड : तालुक्यातील शिवबु्द्रुक गावचे पोलीस पाटील आणि शिवचे फाैजदार म्हणून परिचित असलेले काशिराम बाळू तांबे यांचे ...

Kashiram Tambe passes away | काशिराम तांबे यांचे निधन

काशिराम तांबे यांचे निधन

काशिराम तांबे

खेड : तालुक्यातील शिवबु्द्रुक गावचे पोलीस पाटील आणि शिवचे फाैजदार म्हणून परिचित असलेले काशिराम बाळू तांबे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधनसमयी ते ६८ वर्षांचे होते. त्यांनी कायम हिंदू - मुस्लिम समाजात एकोपा जतन करत सर्वधर्म समभावाची भावना निर्माण केली. त्यामुळे जातीय तणाव कधीच निर्माण झाला नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

जगन्नाथ मुतालिक

चिपळूण : चिपळूण पाग येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त सरकारी अधिकारी जगन्नाथ मुतालिक यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी ते ८१ वर्षांचे होते. त्यांचा वाचनाचा मोठा व्यासंग होता तसेच त्यांना फिरण्याचीही आवड होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

अब्दुल करीम इस्माईल चाैगुले

खेड : तालुक्यातील आष्टी गावचे सुपुत्र अब्दुल करीम इस्माईल चाैगुले यांचे मस्कत येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा दफनविधी मस्कत येथे झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, वडील, भाऊ, बहीण, भावजय असा परिवार आहे.

बाळकृष्ण आंब्रे

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील नावडी - आंब्रेवाडी येथील नाभिक समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते बाळकृष्ण तांबे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधनसमयी ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई, मुलगी, सुना, नातवंडे, भाऊ बहिणी असा परिवार आहे.

Web Title: Kashiram Tambe passes away