शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मर्जीतील ठेकेदारामुळे कळवंडे धरणाचे काम निकृष्ट, भास्कर जाधवांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 12:39 IST

अधिकाऱ्यांना सुनावत दुरुस्तीचे काम दर्जेदार करण्याची सूचना केली

चिपळूण : कळवंडे धरण दुरुस्तीचे काम ठेकेदाराने निकृष्ट केले आहे. अनुभव नसलेल्या ठेकेदाराला काम देण्यात आले. ठेकेदार अधिकाऱ्यांच्या मर्जीतील असल्यानेच धरण दुरुस्तीची कामे निकृष्ट झाली आहेत. त्यातून धरणाला धोका पोहोचण्याचा संभव आहे, असा आरोप आमदार भास्कर जाधव तसेच ग्रामस्थांनी केला. मात्र, धरणाला कोणताही धोका नसून लवकरच दुरुस्तीची कामे योग्यप्रकारे मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.तालुक्यातील कळवंडे धरण दुरुस्तीवरून कळवंडे, कोंढे, शिरळ, पाचाड, मिरजोळी येथील ग्रामस्थ कमालीचे आक्रमक झाले आहेत. धरणाच्या सुरक्षेवरून मंगळवारी ग्रामस्थांची संयुक्त बैठक झाली होती. त्यानंतर बुधवारी आमदार भास्कर जाधव यांच्या पुढाकाराने कळवंडे धरणावर अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी करण्यात आली. या पाहणीसाठी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, चिपळूण विभागाचे उपअभियंता विपुल खोत, उद्योजक वसंत उदेग आणि परिसरातील ग्रामस्थ आले होते.यावेळी उद्योजक उदेग यांनीच अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. धरणाच्या दुरुस्तीसाठी वारंवार खर्च केला जातो. मर्जीतील ठेकेदाराला कामे दिली जातात. ही कामे करताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले जात नाही. निविदा प्रक्रियेत ठेकेदाराने कमी दराने काम घेतले आहे. त्यातून निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. धरणात पाणी असेल तरच लोक शेती करू शकतील, अन्यथा पाणीटंचाईमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, याची अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याचा इशारा दिला. भास्कर जाधव यांनीही अधिकाऱ्यांना सुनावत दुरुस्तीचे काम दर्जेदार करण्याची सूचना केली. अभियंते जगदीश पाटील व वैशाली नारकर यांनी ग्रामस्थांना धरण सुरक्षिततेची हमी दिली. धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. याशिवाय दुरुस्तीचे काम झाल्यानंतरच धरणात पाणीसाठा केला जाईल. तसेच मशिनरीमुळे जे रस्ते खराब झाले आहेत, त्यांचीही दुरूस्ती करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरणBhaskar Jadhavभास्कर जाधव