शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार शशिकांत वारिशे खून प्रकरण: पंढरीनाथ आंबेरकरचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 14:19 IST

यापूर्वीही दोन ते तीन वेळा आंबेरकरचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

रत्नागिरी : राज्यभर चर्चेत असलेल्या राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिशे खून प्रकरणातील संशयित पंढरीनाथ आंबेरकरचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने बुधवारी पुन्हा नाकारला. या जामीन अर्जावर सोमवार आणि मंगळवारी दोन्ही पक्षातर्फे न्यायालयासमोर युक्तिवाद करण्यात आला होता.६ फेब्रुवारीला दुपारी १ वाजण्याच्या सुमारास राजापूर पेट्रोल पंप येथे ही घटना घडली होती. वारिशे पेट्रोल भरून बाहेर पडले होते. त्यावेळी संशयित आंबेरकर याने महिंद्रा थार गाडीने वारिशे यांच्या ताब्यातील दुचाकीला चिरडले होते. असा आरोप संशयितावर ठेवण्यात आला होता. या अपघातात शशिकांत वारिशे गंभीर जखमी झाले होते. कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता.या प्रकरणी पत्रकार वारिशे यांचा मेहुणा अरविंद दामोदर नागले याने राजापूर पोलिस स्थानकात संशयित आंबेरकर विरुद्ध तक्रार दिल्यानंतर भादंवि कलम ३०२, २०१ व महाराष्ट्र प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम २०१७ चे कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या दुर्घटनेनंतर अटक करण्यात आलेला आंबेरकर पोलिस कोठडी संपल्यानंतर अजूनही न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी नुकतेच त्याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्याने आंबेरकरने न्यायालयात जामिनासाठी पुन्हा अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने तोही नाकारला असून, यापूर्वीही दोन ते तीन वेळा आंबेरकरचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ॲड. अनिरुद्ध फणसेकर यांनी काम पाहिले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीJournalistपत्रकारCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय