जयवंत दुधवडकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:34 IST2021-05-06T04:34:13+5:302021-05-06T04:34:13+5:30

राजापूर : काँग्रेसचे माजी राजापूर तालुकाध्यक्ष जयवंत दुधवडकर यांचे मंगळवारी रात्री कोरोनाने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. एस. ...

Jaywant Dudhwadkar passed away | जयवंत दुधवडकर यांचे निधन

जयवंत दुधवडकर यांचे निधन

राजापूर : काँग्रेसचे माजी राजापूर तालुकाध्यक्ष जयवंत दुधवडकर यांचे मंगळवारी रात्री कोरोनाने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.

एस. टी. महामंडळामध्ये वाहक म्हणून ३२ वर्षे त्यांनी सेवा केली होती. त्यावेळी ते कामगार संघटनेचे पदाधिकारी होते. कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामगारांना न्याय मिळवून दिला होता. निवृत्तीनंतर त्यांनी सक्रिय काँग्रेस कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले. दोनवेळा ते राजापूर तालुका अध्यक्ष होते. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले आहे.

अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या काँग्रेसला उभारी देण्याचे काम त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या काळात केले. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी खूप काम केले. मोठ्या जनसंपर्कामुळे त्यांनी तालुक्याच्याच नाही, तर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात चांगली ओळख मिळवली. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरीला हलविण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, विवाहित मुलगी, तीन भाऊ बहिणी, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Jaywant Dudhwadkar passed away