ते फक्त राजन साळवी यांचे मत : विनायक राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 19:55 IST2020-12-24T19:53:53+5:302020-12-24T19:55:19+5:30
Jaitapur atomic energy plant Ratnagiri- रिफायनरी प्रकल्प विनाशकारी असल्याने तो रद्द करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. आता कोणत्याही परिस्थितीत या प्रकल्पाचा पुनर्विचार होणार नाही. आमदार राजन साळवी यांनी याबाबत मांडलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली आहे.

ते फक्त राजन साळवी यांचे मत : विनायक राऊत
रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्प विनाशकारी असल्याने तो रद्द करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. आता कोणत्याही परिस्थितीत या प्रकल्पाचा पुनर्विचार होणार नाही. आमदार राजन साळवी यांनी याबाबत मांडलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली आहे.
जर स्थानिकांना हवा असेल तर नाणार प्रकल्पाबाबत पुनर्विचार केला जाईल, असे मत आमदार साळवी यांनी एका वाहिनीशी बोलताना व्यक्त केले होते. त्याबाबत बोलताना राऊत यांनी, रिफायनरी प्रकल्पाचा पुनर्विचार अशक्य असल्याचे ठामपणे सांगितले.
आमदार साळवी यांनी व्यक्त केलेले मत हे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना पक्ष किंवा महाविकास आघाडी सरकारचे मत नाही. ते मत फक्त त्यांचे वैयक्तिक मत आहे, असेही राऊत म्हणाले.