शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वी तुरे यांच्या सुसाईड नोटमुळे गुंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 13:27 IST

Crime News Ratnagiri Police -आत्महत्या करणाऱ्या मुरुड पोस्टमास्तर पूर्वी तुरे यांच्या पर्समध्ये सापडलेल्या सुसाइड नोटमुळे मृत्यूचा गुंता अजून वाढला आहे. त्यांनी आपल्या पतीला लिहिलेल्या या पत्रात माहेरच्या व्यक्तींबद्दल नाराजी व्यक्त केली असल्याचे समोर आले आहे. मात्र त्यातून त्यांच्या मृत्यूचे कारण उलगडत नसल्याने आत्महत्येच्या कारणाचे गूढ वाढले आहे.

ठळक मुद्देपूर्वी तुरे यांच्या सुसाईड नोटमुळे गुंताआत्महत्येच्या कारणाचे गूढ वाढले

दापोली : आत्महत्या करणाऱ्या मुरुड पोस्टमास्तर पूर्वी तुरे यांच्या पर्समध्ये सापडलेल्या सुसाइड नोटमुळे मृत्यूचा गुंता अजून वाढला आहे. त्यांनी आपल्या पतीला लिहिलेल्या या पत्रात माहेरच्या व्यक्तींबद्दल नाराजी व्यक्त केली असल्याचे समोर आले आहे. मात्र त्यातून त्यांच्या मृत्यूचे कारण उलगडत नसल्याने आत्महत्येच्या कारणाचे गूढ वाढले आहे.पूर्वी तुरे यांनी २६ मार्च रोजी मुरुड येथील टपाल कार्यालयातच गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यांच्या पर्समध्ये त्यांनी पतीला उद्देशून लिहिलेले एक पत्र सापडले आहे. आपल्या माहेरच्या मंडळींना अंत्यसंस्कारासाठी बोलावू नका, असे त्यात त्यांनी लिहिले आहे. त्यांनी प्रेमविवाह केल्यानंतर गेली पाच वर्षे हाकेच्या अंतरावर असणाऱ्या माहेरच्या मंडळींशी त्यांचा अबोला होता.ज्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली, त्यादिवशी नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता त्या मुरुड येथे पोस्ट ऑफिसमध्ये गेल्या. दुपारी त्या हर्णै येथे घरी आल्या होत्या. दुपारी पतीसोबत त्यांची भेटही झाली होती. त्यानंतर पती हर्णै येथील पोस्ट कार्यालयामध्ये ड्यूटीवर निघून गेले आणि पूर्वी आपल्या मुरुड येथील कार्यालयात निघून गेल्या होत्या.दोरी खरेदी करून नेलीपूर्वी तुरे यांनी हर्णै येथील एका दुकानात नायलॉनची दोरी खरेदी केली असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे आत्महत्या करण्याचे त्यांनी आधीच निश्चित केले होते, असा अंदाज पोलिसांनी लावला आहे. मात्र त्यामागचे कारण अजूनही स्पष्ट होत नसल्याने पोलिसांसमोरील गुंता वाढतच चालला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरीDapoli Police Thaneदापोली पोलीस ठाणे