शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

यांत्रिक शेतीस मिळणार चालना

By admin | Updated: January 3, 2015 00:00 IST

कृषी विकास योजना : समूहगटांना मिळणार दहा लाख रुपयांचे अर्थसहाय्य

रत्नागिरी : शेतीचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविण्याकरिता यांत्रिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यात ३०० शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली आहे. शेतकरी गटांच्या माध्यमांतून आधुनिक यंत्रे खरेदीसाठी १० लाख रु.पर्यंत अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मालगुंड, केळ्ये, राजापूर, खेड येथील चार शेतकरी गटांना मोबाईल राईस मिल देण्यात आली आहे.कृषी उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत कृषी विभाग व आत्मातर्फे स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी गटांना सुलभ कर्ज पुरवठा, मजुरांची उपलब्धता, पेरणी ते काढणीपर्यंत आवश्यक असलेली यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात येते. या गटांच्या माध्यमातून सुमारे साडेचारशे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होत आहे. गटांच्या माध्यमातून एकत्रित उत्पन्नाबरोबरच गटातील प्रत्येक सदस्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा उद्देश्य आहे. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक गट रत्नागिरी, चिपळूण, दापोली, खेड या तालुक्यामध्ये आहेत.जिल्ह्यतील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यांना आधुनिक पध्दतीने शेती करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य खरेदी करणे शक्य होत नसल्यामुळे मनुष्यबळावर शेती केली जाते. परिणामी पिकांची लागवड होत नसल्याने उत्पादनात कमालीची घट होत आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या बचत गटांच्या धर्तीवर शेतकरी गट स्थापन करण्यात येत आहेत.शेतकरी गटाव्दारे शेतकऱ्यांना एकत्रित करुन आधुनिक शेती तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येते. त्याचप्रमाणे सामाजिक प्रश्नांची माहिती घेऊन शेतकऱ्यांचे वैयक्तिक प्रश्न सोडविण्यावर भर दिला जाणार आहे.कृषी विभाग व आत्मातर्फे शेतकरी गटांसाठी प्रशिक्षण, अभ्यास दौरे, प्रक्षेत्र भेट, शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, तसेच शेतीवर आधारित उद्योग स्थापन करण्यासाठी विशेष सहकार्य करण्यात येत आहे. कृषी उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या तीनशे श्रेणीतील २० गटांना प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी ५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. यामध्ये टेबल, कपाट आदी साहित्य खरेदी करता येणार आहे. समूह शेतकरी गटात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे व्यक्तिगत उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)