शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाध्यक्ष झाले आता तालुकाध्यक्ष, शहराध्यक्षपदासाठी रस्सीखेच; रत्नागिरीत भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 16:39 IST

गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस

रत्नागिरी : भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश सावंत यांची नियुक्ती केल्यानंतर आता तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तालुकाध्यक्षपदासाठी तीन आणि शहराध्यक्षपदासाठी तीनजण इच्छुक आहेत. या इच्छुकांच्या पक्षनिरीक्षकांकडून मुलाखती घेण्यात आल्या असून, काेणाची वर्णी लागणार, याकडे लक्ष आहे.भाजपच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी ॲड. दीपक पटवर्धन यांच्यानंतर राजेश सावंत यांची वर्णी लागली. जिल्हाध्यक्ष बदलानंतर रत्नागिरी तालुका आणि शहराध्यक्ष निवडीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. नवीन पदाधिकारी नियुक्तीसाठी नुकत्याच रत्नागिरीत मुलाखती घेण्यात आल्या. त्यावेळी संघटनमंत्री शैलेश दळवी, प्रभारी महेश जाधव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग प्रभारी अतुल काळसेकर उपस्थित होते.तालुकाध्यक्षपदासाठी चांदेराईचे दादा दळी, जयगडचे विवेक सुर्वे आणि निवळीचे भाई जठार यांची इच्छुक उमेदवारांमध्ये नावे आहेत. दादा दळी हे चांदेराई ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कार्यरत होते. विवेक सुर्वे हे माजी पंचायत समिती सदस्य आहेत. सध्या ते उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत. निवळीचे भाई जठार हे भाजपमध्ये गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. तिघांमध्ये कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत.त्याचबराेबर शहराध्यक्षपदासाठी दादा ढेकणे, अमित विलणकर, राजन फाळके यांची नावे इच्छुकांमध्ये आहेत. तिघांपैकी काेणाची वर्णी लागणार, हेच आता पाहायचे आहे.

विस्कटलेली घडी नीट हाेणार?गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. अंतर्गत धुसफूसमुळे बाळ माने समर्थक काहीसे दूर हाेते. त्यामुळे शहरातील पक्षाची घडी विस्कटली हाेती. आता नवीन निवडीनंतर ही विस्कटलेली घडी नीट हाेणार का, हेच पाहायचे आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBJPभाजपा