शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत मनसेमध्ये धुमसतेय धुसफूस; अनेकांचा ‘जय महाराष्ट्र’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 18:45 IST

पदाधिकाऱ्यांमधील ताळमेळ विस्कळीत

रत्नागिरी : शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत गटबाजी अजूनही शमलेली नसून गटबाजी जाेर धरत आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली धुसफूस अजूनही संपलेली नसल्याने पदाधिकाऱ्यांची स्वतंत्रपणे वाटचाल सुरू आहे. पक्षातील या अंतर्गत गटबाजी आणि राजकारणामुळेच काहींनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्च २००६ मध्ये पक्षाची स्थापना केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांनी त्यांच्या पक्षाचा झेंडा हाती घेतला. मात्र, गेल्या १८ वर्षांत पक्षाने भरारी घेण्याऐवजी पक्षाला गळतीच अधिक लागली आहे. पक्ष वाढीसाठी कार्यरत राहणारे अनेक जुने-जाणते पक्षापासून दूर झाले आहेत. त्यातच रत्नागिरी शहरात अंतर्गत गटबाजीमुळे काेणाशी काेणाचे पटत नसल्याचे समाेर येत आहे. त्यामुळेच रत्नागिरीत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांना माेजकेच पदाधिकारी उपस्थित राहत आहेत.

पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये याेग्य ताळमेळ नसल्याने पक्षातील अनेकांनी पक्षाला साेडचिठ्ठी देऊन अन्य पक्षांचा आधार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत तर काहींनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सध्या माेजक्या पदाधिकाऱ्यांनी पक्षवाढीची धुरा सांभाळली आहे. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाची वाढ खुंटली आहे.

राज्य सरचिटणीसांचे दुर्लक्षखेड येथील वैभव खेडेकर राज्य सरचिटणीस म्हणून पक्षाची धुरा सांभाळत आहेत. मात्र, उत्तर रत्नागिरी वगळता त्यांनी जिल्ह्यातील अन्य भागात पक्षवाढीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यामुळे अन्य तालुक्यांमध्ये पक्ष वाढ खुंटली आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीवरही त्यांनी ‘उतारा’ काढलेला नाही.

एकमेकांकडे पाठरत्नागिरी शहरातील काही सामाजिक प्रश्न हाताळून पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या लढ्यात तालुका किंवा शहरातील पदाधिकारी काेठेच दिसत नाहीत. त्यातच शहराध्यक्षांनी कार्यक्रम घेतला तर तालुकाध्यक्ष नाही, तालुकाध्यक्षांनी कार्यक्रम घेतला तर जिल्हाध्यक्ष नाहीत, अशीच स्थिती आहे.

तालुकाध्यक्ष दूरचकाही दिवसांपूर्वी तालुकाध्यक्षांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला हाेता. पक्षातीलच पदाधिकाऱ्यांनी हा हल्ला केल्याचा आराेप त्यांनी केला हाेता. या घटनेनंतर तालुकाध्यक्ष पक्षापासून दूरच राहिले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणMNSमनसे