लांजाच्या नगराध्यक्ष अपात्र

By admin | Published: May 5, 2017 11:34 PM2017-05-05T23:34:23+5:302017-05-05T23:34:23+5:30

पतीने केलेल्या अनधिकृत बांधकामाचा ठपका; जिल्ह्यातील पहिलीच घटना

Ineligible President of the Lonavla | लांजाच्या नगराध्यक्ष अपात्र

लांजाच्या नगराध्यक्ष अपात्र

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : पतीने केलेल्या अनधिकृत बांधकामाबद्दल लांजाच्या नगराध्यक्ष संपदा योगेश वाघधरे यांना जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी नगराध्यक्ष तसेच सदस्यपदासाठीही अपात्र ठरविले आहे. लांजा नगरपंचायतीत राष्ट्रवादी-भाजपच्या शहर विकास आघाडीची सत्ता असून, वाघधरे यांच्या अपात्रतेनंतरही सत्तेला धक्का न बसण्याइतके संख्याबळ आघाडीकडे आहे.
संपदा वाघधरे या जानेवारी २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सदस्या म्हणून लांजा नगरपंचायतीत निवडून आल्या. शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपच्या शहर विकास आघाडीने ही निवडणूक लढविली होती. पहिल्याच वर्षी वाघधरे यांना नगराध्यक्ष पद देण्यात आले. सुमारे सव्वा दोन वर्षे त्या लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यपदाचा कार्यभार सांभाळत होत्या. मात्र, या कालावधीत त्यांचे पती योगेश वाघधरे यांनी शासकीय विश्रामगृहानजीक एका इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. या इमारतीच्या मंजूर आराखड्यापेक्षा अधिक बांधकाम त्यांनी विनापरवाना केले होते. याबाबत लांजा नगरपंचायतीचे सदस्य सुनील कुरूप यांनी आॅक्टोबर २०१६ मध्ये जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्याकडे याचिका दाखल केली होती. पत्नीच्या पदाचा गैरवापर करून योगेश वाघधरे अनधिकृत बांधकाम करीत असल्याने नगराध्यक्ष संपदा वाघधरे यांना अपात्र करण्याची मागणी त्यांनी केली होती.
बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी यांनी यावर अंतिम निर्णय देताना संपदा वाघधरे यांना नगराध्यक्ष पदासाठी तसेच नगरपंचायतीच्या सदस्य पदासाठीही अपात्र ठरविले आहे. तसे आदेश त्यांनी संपदा वाघधरे यांना दिले आहेत.
शहर विकास आघाडीचे ११ आणि शिवसेनेचे सहा सदस्य या नगरपंचायतीत निवडून आले आहेत. आता शहर विकास आघाडीची एक जागा कमी होऊन निवडणूक होणार असली तरी सत्ता शहर विकास आघाडीकडेच राहणार आहे. आघाडीतील चर्चेनुसार आता हे पद भाजपकडे जाणार आहे.

Web Title: Ineligible President of the Lonavla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.