शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या कुबड्या घेतलेल्यांनी लाथ घालायची भाषा करु नये; मंत्री उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

By मनोज मुळ्ये | Updated: February 6, 2024 15:23 IST

'ही खरी गद्दारी आहे आणि ती गाडायला हवी'

रत्नागिरी : जे काँग्रेसच्या कुबड्या घेऊन नाचत आहेत, त्यांनी कोणालाही लाथ घालायची भाषा करु नये, असा पलटवार उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला. आपण रत्नागिरीत ऐतिहासिक आणि धार्मिक कार्यक्रम केले. या दोन कार्यक्रमांच्या मध्ये एक मनोरंजनाचा कार्यक्रम करण्यात आला, अशी टीकाही त्यांनी ठाकरे यांच्या मेळाव्यावर केली.मंगळवारी एका ऑनलाईन पत्रकार परिषदेत मंत्री सामंत यांनी ठाकरे यांच्या रत्नागिरी दौऱ्याबाबत टीका केली. रत्नागिरीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा ऐतिहासिक आणि विठ्ठल मूर्तीच्या लोकार्पणाचा धार्मिक कार्यक्रम आपण केला. या कार्यक्रमांना रत्नागिरीकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपण आभारी आहोत, असे ते म्हणाले. या दोन कार्यक्रमांच्या मधे एक करमणुकीचाही कार्यक्रम होता, असे त्यांनी ठाकरे यांच्या सभेबद्दल सांगितले. आधी जे शिवाजी पार्कवर सभा घेत होते, त्यांच्यावर आता रस्त्यावर, बोळात, चावडीवर सभा घेण्याची वेळ आली आहे. ही सभा म्हणजे टोमणे आणि कुटुंबाच्या बदनामीचा कार्यक्रम होता, असे ते म्हणाले.आपण गद्दाराच्या पेकाटात लाभ घालायला आलो आहोत, असे पक्षप्रमुखांनी आपल्या भाषणात सांगितले. मात्र काँग्रेसच्या कुबड्या घेऊन नाचणाऱ्यांनी लाथ घालायची भाषा करु नये, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

खरंच गद्दारांना गाडायचे आहेगद्दारांना गाडायचे आहे, या उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याची आपण पूर्ण सहमत आहोत. बाळासाहेब सांगायचे की मी शिवसेनेची कधी काँग्रेस होऊ देणार नाही. अशी वेळ आली तर आपण पक्ष बंद करू. पण आता ठाकरे शिवसेना काँग्रेससोबत गेली आहे. ही खरी गद्दारी आहे आणि ती गाडायला हवी आहे, अशी टीका मंत्री सामंत यांनी केली.

व्यवसाय नसताना इमारतआपल्या वडिलोपार्जित बांधकामाच्या व्यवसायावरुन ठाकरे यांनी टीका केली. पण एक गोष्ट चांगली आहे की आमचा व्यवसाय आहे, हे त्यांनी मान्य केले. अर्थात त्यांनी आपल्या व्यवसायावर टीका केली असली तरी कोणताही व्यवसाय नसताना त्यांनी सहा मजली घर कसे बांधले, हा प्रश्न आपण आजपर्तंत कधीही विचारला नाही आणि यापुढेही विचारणार नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना