शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

ग्रामीण भागात वाढतेय वाचनाची संस्कृती, चार गावांमध्ये अवतरले जग पुस्तकांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 12:09 IST

णसाने दिवसातून दोन रुपये कमविले तर एक रुपया वाचनासाठी तर एक रुपया हा भाकरीसाठी ठेवावा. भाकरी तुम्हाला जगवते आणि पुस्तकं तुम्हांला जगायला शिकवितात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या मौलिक विचारातून प्रेरित होऊन सांडेलावगण (ता. रत्नागिरी) येथील प्रसाद सुरेश पाष्टे या तरूणाने वाचन वाचन संस्कृती वाढविण्याचा वसा उचलून आपल्या गावातील दोन वाड्यांमध्ये ह्यजग पुस्तकांचेह्ण हे वाचनालय सुरू केले.

ठळक मुद्देग्रामीण भागात वाढतेय वाचनाची संस्कृती, चार गावांमध्ये अवतरले जग पुस्तकांचेनवनिर्माण वाचनकट्टा : तरूणांच्या पुढाकाराने रूजली वाचन चळवळ

शोभना कांबळे 

रत्नागिरी : माणसाने दिवसातून दोन रुपये कमविले तर एक रुपया वाचनासाठी तर एक रुपया हा भाकरीसाठी ठेवावा. भाकरी तुम्हाला जगवते आणि पुस्तकं तुम्हांला जगायला शिकवितात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या मौलिक विचारातून प्रेरित होऊन सांडेलावगण (ता. रत्नागिरी) येथील प्रसाद सुरेश पाष्टे या तरूणाने वाचन वाचन संस्कृती वाढविण्याचा वसा उचलून आपल्या गावातील दोन वाड्यांमध्ये ह्यजग पुस्तकांचेह्ण हे वाचनालय सुरू केले.

या वाचनालयाच्या उपक्रमाने प्रेरीत झालेल्या आजुबाजुच्या इतर गावातील मुलांनीही आता आपल्या गावातील वाड्यांमध्ये ही चळवळ सुरू केली आहे. सांडेलावगणबरोबरच आता रत्नागिरी तालुक्यातील ओरी, खालगाव आणि कापडगाव या गावांमधील प्रत्येकी दोन वाड्यांमध्ये वाचनालय सुरू करण्यात आले आहे.

वाचनप्रेमी असलेल्या प्रसाद पाष्टे याने हे वाचनालय ग्रामीण भागातील आपल्या गावी, स्वत:च्या घरी सुरू केले आहे. आत्तापर्यंत त्याच्या या वाचनालयात अनेकांचा हातभार मिळाल्याने सुमारे ५५० पुस्तके गोळा झाली आहेत. याच ठिकाणी नवनिर्माण वाचक कट्टयाची सुरुवात केली असून या कट्टयाला उत्तम प्रतिसाद गावच्या शाळा, कॉलेजमधील मुलांनी दिला आहे.

हा नवनिर्माण वाचन कट्टा दर रविवारी १० ते १२ यावेळेत नियमित भरवण्यात येतो. परिसरातील इतर गावांसाठीही खुला करण्यात आला आहे. अमेरिकास्थित बाळ गद्रे आणि त्यांची पत्नी हे दोघेही या वाचनालयाचे वाचक असून त्यांनी ३ हजारांची पुस्तकेही या वाचनालयाला देणगीदाखल दिली आहे.प्रसाद याने सांडेलावगण येथे जग पुस्तकांचेची पहिली शाखा सुरू केल्यानंतर वाचन कट्टाही सुरू केला. या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती तो फेसबूकवर वाचनालयाच्या पानावर नेहमी टाकत असे. त्याच दरम्यान फेसबुकवर रत्नागिरीतील ओरी या गावातील सोनल मांजरेकर हिची ओळख झाली. ओरी हे रत्नागिरी तालुक्यातील एक आड वळणाच गाव.

इथे गावात बस जाणे, सुद्धा कठीण. तिथे पुस्तके पोहोचली तर तिथल्या मुलांची वाचनाची आवड चांगली निर्माण होईल. म्हणून तिला प्रसाद याने वाचनालयाची पूर्ण माहिती फोन वरूनच सांगितली. त्यानुसार तिने सर्व मुलांची यादी इयत्तेप्रमाणे पाठविली. पण या वाचनालयातील पुस्तके तिला कशी मिळणार? अखेर प्रसादच्या गावातील स्नेहल बेंद्रे हिच्याकडे पुस्तके पाठवून दिली. त्या दिवसापासून सोनल हिने आपल्या गावातल्या मुलांना एकत्रित करून वाचन कट्टयास सुरुवात केली.तिसरी शाखा आज खालगाव येथील सोनाली धामणे या आयटीआयमध्ये शिकणाऱ्या मुलीने तिच्या वाडीत सुरू केली. सध्या सोनाली धामणे, नीलीमा धामणे आणि ऋतुजा गोताड या तिघींजणी खालगाव येथील दोन वाड्यांमध्ये वाचनालय सुरू करून चळवळ वाढवीत आहेत.या सर्वच मुलांंमध्ये एक समाजभान, वाचनाची गोडी आहे, पुस्तके किती महत्वाची आहेत आणि ती ग्रामीण भागात पोहोचली पाहिजेत, यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करीत आहेत. आणि त्यांच्या घरी या मुलांना बसवून एक ते दोन तास ते वाचन करून घेत आहेत. वाचन चळवळ सतत सुरूच रहावी, यासाठी हे युवा पिढी तळमळीचे प्रयत्न करीत आहे.

या सर्व वाचनालयांना सांडेलावगण येथील वाचनालयातून साखळी पद्धतीने पुस्तके पुरविली जात आहेत. मात्र, सध्या या वाचनालयाकडे असलेल्या पुस्तकांमध्ये बाल पुस्तकांची संख्या कमी आहे. बाल वाचक वाढविणे, हे या साऱ्यांचे महत्वाचे उद्दिष्ट असल्याने त्यासाठी या चारही गावांमधील हा युवा वर्ग झपाटल्यासारखा काम करीत आहे.सुरूवात गावातप्रसाद याने सांडेलावगण वरची वाडी आणि खालची वाडी अशा दोन ठिकाणी ह्यजग पुस्तकांचेह्णच्या शाखा सुरू केल्या आहेत. प्रसाद मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक येथे पर्यटन व्यवस्थापक म्हणुन काम करीत असतानाच तो वाचन चळवळही वाढवीत आहे. या वाचनालयाच्या वाचकांचे वाढदिवसही साजरे करण्याचा अनोखा उपक्रमही राबविला जात आहे.कापडगावात दोन वाचनालयेकापडगाव येथील सोनाली कुरतडकर हिनेही आपल्या गावामध्ये वाचनालय सुरू केले आहे. सध्या सोनल स्पर्धा परिक्षेचा अभ्यास घरीच करते. ज्या वर्गात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास ती करीत होती, त्या रत्नागिरी कुणबी भवन येथे शामराव पेजे स्पर्धा परीक्षा अकादमीत ती आता शिकवते, आणि पुढचा अभ्यासही करते.

कापडगाव येथील युवराज कोत्रे, हा महाविद्यालयीन युवकही या उपक्रमात सहभागी झाला आहे. याचबरोबर आता या चळवळीत प्रणाली बैकर, तुषार मांडवकर, धनंजय पाष्टे, राहूल बेनेरे, श्रद्धा इरमल, आकाश सावंत आदी सहभागी झाले आहेत.

खालगावमध्ये दोन वाड्यांमध्ये वाचनालये...खालगावमधील सोनाली धामणे ही आयटीआयमध्ये शिकत आहे. जग पुस्तकाचे या उपक्रमाने प्रभावीत होऊन तिनेही खालगावमध्ये हा उपक्रम चालविण्यास सुरूवात केली आहे. तिने नीलीमा धामणे हिच्यासोबत खालगाव निवईवाडी येथे जग पुस्तकांचे वाचनालयाची शाखा सुरू केली आहे. तर ऋजुता गोताड या तरूणीने आपल्या गोताडवाडीत हा वाचनालय उपक्रम सुरू केला आहे. खालगावच्या या वाचनालयांमध्ये बालवाचक आकृष्ट होत आहेत.

ओरीत दोन वाचनालयेओरीतील सोनल मांजरेकर ही चाफे येथील कॉलेजमध्ये कला शाखेत शिकत आहे. तिने आपल्या गावातील दोन वाड्यांमध्ये वाचनालय सुरू आहे. सोनल मांजरेकर हिच्याशी प्रसाद याची स्पर्धा परीक्षा वर्गातील ओळख होती. तिने आपल्या वर्गातील सोनाली धामणे, ऋतुजा गोताड, निलीमा धामणे या मैत्रिणींना जग पुस्तकांच हा उपक्रम राबवीत असल्याचे सांगितले. या मुलीही तयार झाल्या आणि आता कापडगाव बरोबरच ओरी येथेही या वाचनालयाच्या दोन वाड्यांमध्ये शाखा सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :literatureसाहित्यRatnagiriरत्नागिरी