शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

शाळांची गुणवत्ता वाढवा

By admin | Updated: October 13, 2015 00:12 IST

ऐश्वर्या घोसाळकर : वालोपे शाळेचा अमृत महोत्सव

चिपळूण : मराठी शाळांच्या कमी होत चाललेल्या पटसंख्येचा विषय चिंंतेची बाब आहे. पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत आहेत. पालकांचा ओढा खासगी शाळांकडे का आहे? हे लक्षात घेऊन मराठी शाळांनी त्याप्रमाणे आपलीही गुणवत्ता वाढवली तर मराठी शाळांची पटसंख्याही वाढेल, असा विश्वास जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती ऐश्वर्या घोसाळकर यांनी व्यक्त केला. चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, वालोपे नं. १चा अमृत महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिपळूण-संगमेश्वरचे आमदार सदानंद चव्हाण होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वास सुर्वे, शिवसेनेचे पंचायत समितीमधील गटनेते अभय सहस्त्रबुध्दे, पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम, शशिकांत चाळके, गटशिक्षणाधिकारी श्रीधर शिगवण, केंद्रप्रमुख सायली शिंंदे, वालोपेच्या सरपंच मयुरी मूरकर, उपसरपंच रवींद्र तांबिटकर, शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा संदे, प्रेरणा जाधव, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अस्मिता आयरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशोक आयरे, झोलाईदेवी देवस्थानचे खोत - मानकरी पांडुरंग आयरे, कळंबस्तेच्या सरपंच आशा राक्षे, उपसरपंच विवेक महाडिक, दळवटणेचे सरपंच शेट्ये आदी उपस्थित होते.यावेळी गटनेते अभय सहस्त्रबुध्दे, माजी सभापती शौकतभाई मुकादम, गटशिक्षणाधिकारी श्रीधर शिगवण, केंद्रप्रमुख सायली शिंंदे, पदवीधर शिक्षिका प्रेरणा जाधव, निवृत्त मुख्याध्यापक उदेग, तांबे, तिवरेकर गुरूजीं यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक करताना अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र तांबिटकर यांनी शाळेच्या पंच्याहत्तर वर्षांच्या कालावधीचा आढावा घेतला. याप्रसंगी सर्व मान्यवरांचा जास्वंदीचे रोप व श्रीफळ देऊन आगळ्या पद्धतीने सत्कार करण्यात आला. अमृत महोत्सव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन सदानंद चव्हाण व सभापती ऐश्वर्या घोसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला आर. सी. काळे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रामप्रसाद कान्हेरे, शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक तांबे, उदेग, तिवरेकर, पिंंपुटकर गुरूजी तसेच सावंत, तांबे, पिंंपुटकर, नागेश आदी शिक्षिका, अमृत महोत्सव समितीचे दिलीप मयेकर, मंगेश मुरकर, अंकुश नागवेकर, राजेंद्र टाकळे, विलास पवार, शांताराम जाधव, शंकर जाधव, धोंडिराम कदम, मोहन सुर्वे, सुभाष मयेकर, रविंउदय आयरे, सोनल आयरे, मंगला देवळेकर, प्रिया शिर्के, बाळकृष्ण कदम, सायली जाधव, समृध्दी वालोपकर, प्रभा शिंंदे, गामसेवक गावडे, कृषी सहाय्यक उमा जाधव, दत्ताराम आयरे उपस्थित होते. संदेश पवार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)चिंतेची बाब : शाळांची पटसंख्या वाढेलमराठी शाळांमधून विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत चालली आहे. पालकांचा ओढा खासगी शाळांकडे अधिक आहे. हा ओढा वाढण्याचे नेमके कारण काय आहे? याचा विचार केला पाहिजे. मराठी शाळांनी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ऐश्वर्या घोसाळकर यांनी सांगितले.पटसंख्या रोडावलीजिल्हा परिषद मराठी माध्यमाच्या शाळांमधून पटसंख्या कमी होत चालली आहे. हा चिंतेचा विषय असून, शाळा ओस पडू लागल्या आहेत.