बीएसएनएलचा भू येथील टॉवर बंद असल्याने गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:30 AM2021-03-26T04:30:33+5:302021-03-26T04:30:33+5:30

ऱाजापूर : तालुक्यातील भू येथील बीएसएनएलचा मोबाईल टॉवर गेले पाच दिवस बंद ...

Inconvenience as BSNL's tower at Bhu is closed | बीएसएनएलचा भू येथील टॉवर बंद असल्याने गैरसोय

बीएसएनएलचा भू येथील टॉवर बंद असल्याने गैरसोय

Next

ऱाजापूर : तालुक्यातील भू येथील बीएसएनएलचा मोबाईल टॉवर गेले पाच दिवस बंद असल्याने येथील ग्राहकांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात तकारी करूनही दखल घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

तालुक्यातली भू येथे छोटेखानी बाजारपेठ आहे. परिसरातील सुमारे १५ गावांचा या बाजारपेठेशी संपर्क येतो. त्यामुळे भू येथे बँकेसह अन्य कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. मात्र, गेले पाच दिवस मोबाईल नेटवर्क नसल्याने सर्वांचीच गैरसोय होत आहे. ऑनलाईन शिक्षण अद्यापही सुरु असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

यापूर्वीही असे प्रकार घडले होते. त्यावेळी व आताही अनेक लोकांनी यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. भू येथील मोबाईल टॉवर त्वरित कार्यान्वित करावा, अशी मागणी खिणगिणीचे माजी उपसरपंच विजय पाध्ये यांनी केली असून, तो सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Inconvenience as BSNL's tower at Bhu is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.