घरडा रुग्णालयाच्या उपकेंद्राचे खेड शहरात उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:30 IST2021-03-20T04:30:12+5:302021-03-20T04:30:12+5:30
खेड : घरडा फाऊंडेशन संचलित बाई रतनबाई घरडा चॅरिटेबल हॉस्पिटलचे उपकेंद्र खेड शहरात बसस्थानक नजीकच्या विश्वलीला इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ...

घरडा रुग्णालयाच्या उपकेंद्राचे खेड शहरात उद्घाटन
खेड : घरडा फाऊंडेशन संचलित बाई रतनबाई घरडा चॅरिटेबल हॉस्पिटलचे उपकेंद्र खेड शहरात बसस्थानक नजीकच्या विश्वलीला इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सुरू करण्यात आले आहे. गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचे उद्घाटन झाले.
तालुक्यातील लवेल येथे घरडा कंपनीतर्फे हॉस्पिटल चालवले जात असून, या रुग्णालयात जास्तीत जास्त गरजू रुग्णांना उपचार देत यावेत, म्हणून रुग्णालय व्यवस्थापनाने खेड शहरात उपकेंद्र सुरू केले आहे. या उपकेंद्राचे उद्घाटन गुरुवारी घरडा फाऊंडेशनच्या विश्वस्तांचे प्रतिनिधी जे. के. पाटील, खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील शल्यचिकित्सक डॉ. गरुड, डॉ. प्रेमसागर जाधव, डॉ. बी. पवार, तालुका आरोग्य अधिकारी राकेश शेळके, डॉ. ठोंबरे, डॉ. मिलिंद महाडिक, शिवसेना शहरप्रमुख निकेतन पाटणे, अभिषेक पाटणे, बिपीन पाटणे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन घरडा रुग्णालयाचे अधिकारी शिवम सोनी, निर्लेप वैद्य, मर्लिन, जनसंपर्क अधिकारी विवेक बनकर यांनी केले.
..................
खेड फोटो 191
फोटो ओळ : खेड शहरातील विश्वलीला इमारतीत मान्यवरांच्या उपस्थितीत घरडा रुग्णालयाच्या उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले.