शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
3
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
4
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
5
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
6
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
7
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
8
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
9
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
10
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
11
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
12
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
13
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
14
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
15
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
16
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
18
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
19
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
20
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते

Gram Panchayat Election: कोकणात सरपंचपदाच्या उमेदवाराची शिंदे गटाकडून पळवापळवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 16:07 IST

शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा गावकी, भावकीचा दबाव

मंडणगड : वेसवी येथील महाविकास आघाडीच्यासरपंचपदाच्या उमेदवार मानसी तरळ व त्यांचे पती विनायक तरळ यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला नसल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे रविवारी (११ डिसेंबर) पत्रकार परिषदेत करण्यात आला. सरपंचपदाच्या उमेदवाराची शिंदे गटाकडून पळवापळवी करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.निवडणूक अर्ज मागे घेतल्याची तारीख संपल्यानंतर १० डिसेंबर २०२२ रोजी वेसवीच्या महाविकास आघाडीच्या सरपंचपदाच्या उमेदवार व त्यांचे पती या दोघांनी आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगण्यात आले. शिंदे गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिल्याचेही जाहीर करण्यात आले. याबाबत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन या वृत्ताचे खंडन केले.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, प्रकाश शिगवण, रघुनाथ पोस्टुरे, फैरोज उकये, वैभव कोकाटे, सुभाष सापटे, अनिल रटाटे, विनायक तरळ, मानसी तरळ, हरसरत खोपटकर, वसीम मुल्ला यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.मुझफ्फर मुकादम यांनी शिंदे गटाच्या कार्यपद्धतीवर टीका करताना लोकशाही मार्गाने निवडणूक जिंकण्याचे आवाहन केले. २०१९ पासून मतदारसंघातील राजकारणाचा स्तर खालावलेला असल्याचे ते बाेलले. विद्यमान  आमदारांना मते मिळवण्यासाठी त्यांनी केलेली विकासकामे व कामाची पद्धत यावर विश्वास राहिलेला नाही. वर्चस्व गाजवण्यासाठी विकासाचे मूळ मुद्दे व तालुक्यातील जनतेचे प्रश्न बाजूला सारून ते करीत असलेल्या राजकारणाची नोंद येथील मतदारांकडे असल्याचे मुकादम म्हणाले.आमदार जनतेच्या प्रश्नावर काम करण्यापेक्षा जातीमध्ये, भावकीमध्ये, गावामध्ये तंटे निर्माण करुन आपले राजकारण पुढे नेत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. प्रकाश शिगवण यांनी तेरा ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी शिंदे गटास धोबीपछाड दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले. तर उमेदवारांच्या पळवापळवीच्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली.गावकी, भावकीचा आमच्यावर दबावतरळ पती-पत्नी यांनी खुलासा करताना शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी आमच्यावर गावकी व भावकीचा दबाव आणून आम्हा दोघांना आमदारांकडे घेऊन गेल्याचे सांगितले; मात्र आम्ही महाविकास आघाडीतच असून, निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे मानसी तरळ व विनायक तरळ यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकsarpanchसरपंचEknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी