शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानाच्या युगात दिवाळीत शुभेच्छा देणारे ग्रीटिंग कार्ड अन् पत्र हरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 12:48 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील आमदारांनी पोस्टाद्वारे आपल्या मतदारांना भेटकार्ड पाठविणे पसंत केले

अरुण आडिवरेकररत्नागिरी : सण, उत्सव म्हटलं की, एकमेकांना शुभेच्छा देणे आलेच. मात्र, आजकाल सोशल मीडियाचा वापर वाढल्याने ग्रीटिंग कार्ड व पत्र पाठविण्याचे प्रमाण कमी  झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अकरा दिवसांत २४ हजार कार्डस् आणि पत्रे आली आहेत. मात्र, पूर्वी सुमारे ५० हजार शुभेच्छा पत्र येत होती.ग्रामीण भागातील संदेश वहनामध्ये आजही पोस्ट खाते प्रभावी माध्यम ठरत आहे. पूर्वी सणाला शुभेच्छा देणारे एकतरी पत्र किंवा ग्रीटिंग कार्ड यायचे. हळूहळू काळ बदलत गेला आणि तंत्रज्ञानाचे युग आले. त्यामुळे एकमेकांना पत्र पाठवून शुभेच्छा देण्याचे प्रमाण कमी झाले. फोनवरून एकमेकांना शुभेच्छा देणे सुरू झाले. त्यातही आता सोशल मीडियाचा वापर इतका वाढला आहे की, एक मेसेज टाईप करायचा आणि तो सर्वांना पाठवून द्यायचा, हे वाढले आहे. सोशल मीडियाच्या या वापरामुळे पोस्टाद्वारे शुभेच्छा पत्र किंवा कार्ड पाठविणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे.रत्नागिरी जिल्ह्यात १७ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत केवळ २४ हजार शुभेच्छा पत्र दिवाळीच्या काळात आली आहेत. सोशल मीडियामुळे पूर्वीपेक्षा निम्म्यावर हे प्रमाण आले आहे.

आमदारांचीच भेटकार्ड जास्तसाेशल मीडियाचा वापर वाढल्याने पोस्टाने भेटकार्ड पाठविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे दुकानातून भेटकार्डची हाेणारी विक्रीही कमी झाली आहे. तरीही काहीजण आजही पोस्टाने भेटकार्ड पाठवून शुभेच्छा देतात. रत्नागिरी जिल्ह्यातील आमदारांनी पोस्टाद्वारे आपल्या मतदारांना भेटकार्ड पाठविणे पसंत केले आहे. त्यामुळे पोस्टात आलेल्या भेटकार्डांमध्ये आमदारांचीच भेटकार्ड जास्त आहेत.

५० हजार यायची, आता २४ हजाररत्नागिरी जिल्हा हा दुर्गम आहे. त्यामुळे संवादासाठी पोस्ट हे एक उत्तम साधन आहे. खेडोपाडी इंटरनेटची समस्या कायम आहे. मुंबई, पुण्यात फास्ट इंटरनेट आहे. पण, ग्रामीण भागात नाही. आजही पोस्ट खाते अविरतपणे आपली सेवा देत आहे. आजही २४ हजार लोकांनी पोस्टाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. पूर्वी ४० ते ५० हजार भेटकार्ड येत होती.

पोस्टाने भेटकार्ड पाठविली जात असली तरी सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यामुळे पोस्टापेक्षा सोशल मीडियावरच शुभेच्छांचा वर्षाव अधिक असतो.

रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी भाग हा दुर्गम आहे. त्यामुळे पोस्ट प्रभावी ठरते. त्यातही पत्र लिहिणे ही एक कला आहे आणि ती रत्नागिरीकरांकडे जास्त आहे. रत्नागिरीला सांस्कृतिक वारसा असून, ती संस्कृती आजही जपली आहे. त्यामुळेच रत्नागिरीकर आजही पोस्टाने भेटकार्ड पाठवतात. - नंदकुमार कुरळपकर, डाक अधीक्षक, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPost Officeपोस्ट ऑफिसDiwaliदिवाळी 2022