शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

दापोली नगरपंचायतीत नगराध्यक्ष शिवसेनेचा तर उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, 'असा' ठरला फार्म्युला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 13:38 IST

माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम व जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्यातील वादामुळे निवडणुकीत शिवसेनेत दोन गट

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या ममता मोरे तर उपनगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक खालिद रखांगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. या दोन्हा पक्षात नगराध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षाचा फार्म्युला ठरला आहे. पहिले अडीच वर्ष नगराध्यक्षपद शिवसेनेकडे सोपविण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून ममता मोरे यांच्या नावावर नगराध्यक्ष म्हणून एक मताने शिक्कामोर्तब करण्यात आले. तर राष्ट्रवादीकडून नगरसेवक खालीद रखांगे यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी देण्यात आली.शिवसेनेच्या ममता मोरे यांच्या विरोधात शिवसेनेच्या नगरसेविका शिवानी खानविलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक अटीतटीची बनली होती. परंतु शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य आघाडीवर ठाम होते. त्यामुळे शिवानी खानविलकर यांनी नगराध्यक्षपदासाठी भरलेला उमेदवारी अर्ज निरर्थक बनला. 

शिवसेनेचे बंडखोर अपक्ष नगरसेवक यांच्या पाठिंब्यावर शिवानी खानविलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु बहुमताच्या जादूचा आकडा गाठणे खानविलकर यांना शक्य झाले नाही. शिवसेनेकडून व्हीप  सुद्धा बजावण्यात आला. शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदाच नगरसेविका बनलेल्या तरुण नगरसेविका शिवानी खानविलकर यांनी पदार्पणातच पक्षाविरोधात बंड केल्याने शिवसेनेत अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम व जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्यातील वादामुळे निवडणुकीत शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची आघाडी नगरपंचायत निवडणुकीत झाले आहे, परंतु ही आघाडी विद्यमान आमदार योगेश कदम यांना मान्य नाही. त्यामुळे आमदार समर्थकांनी निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविली होती. परंतु नागरिकांनी मात्र आघाडीला स्पष्ट बहुमत दिले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDapoli Nagar Panchayatदापोली नगरपंचायतNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना