परिवहन महामंडळाकडून सुधारित आसन रचना

By Admin | Updated: March 25, 2015 00:45 IST2015-03-24T21:17:28+5:302015-03-25T00:45:15+5:30

एस. टी. प्रशासन : वाहकांच्या जागेवरून पुन्हा संघटनेची व्यवस्थापकांकडे मागणी

Improved seat composition by transport corporation | परिवहन महामंडळाकडून सुधारित आसन रचना

परिवहन महामंडळाकडून सुधारित आसन रचना

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसेसमध्ये सुधारित आसन रचनेनुसार वाहकाचे आसन निश्चित करण्यात आले आहे. मिडी बसमध्ये ३२ क्रमांकाचे तर ६५ आसनी बसमध्ये ६३ क्रमांकाचे राहील. निमआराम बसमध्ये ४०, तर वातानुकूलीत बसमध्ये ४५ क्रमांकाचे निश्चित करण्यात आले आहे.आसन सुरक्षेच्यादृष्टीने पूर्वी प्रमाणे प्रवासी चढउतार करतात, त्या दरवाजाच्या मागच्या बाजूला वाहकांचे आसन निश्चित करावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाने दखल घेत ताफ्यातील विविध प्रकारच्या गाड्यांमधील विविध घटकांसाठी व वाहकांसाठी राखीव ठेवायच्या आसन व्यवस्थेबाबत सूचना प्रसारित केल्या आहेत. वाहकासाठी साधी ६५ आसनी बस वगळता अन्य सर्व बसेसमध्ये चालकाच्या बाजूला राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी चढ उतार करताना वाहकाचे लक्ष राहू शकत नाही. परिणामी प्रवासी चढताना किंवा उतरताना एखादा अपघात होऊन प्रवासी जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी वाहकास जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. तसेच प्रवाशी चढ उतार करतात त्या दरवाजाच्या मागच्या बाजूला आसन असल्यास वाहकांचे योग्य तऱ्हेने प्रवाशी चढ उतार करताना लक्ष राहू शकते. त्यामुळे प्रवाशाच्या सुरक्षेसाठी पूर्वीप्रमाणे प्रवाशी चढउतार करतात त्या दरवाजाच्या मागच्या बाजूला वाहकाचे आसन निश्चित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.सुधारित आसन रचनेनुसार वाहकाचे आसन मिडी बसमध्ये ३२ क्रमांकाचे तर ६५ आसनी बसमध्ये ६३, निमआराम बसमध्ये ४० तर वातानुकूलीत बसमध्ये ४५ क्रमांकाचे निश्चित करण्यात आले आहे. शिवाय कार्यशाळा व्यवस्थापनाला मध्यवर्ती कार्यशाळेत बांधण्यात येणाऱ्या नवीन बसमध्ये आसन रचनेच्या सूचनादेखील करण्यात आल्या आहेत. शिवाय सर्व विभागांनाही त्यांच्या ताफ्यात असलेल्या सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये सुधारित आसन क्रमांकाची रचना व सुधारित बदलाप्रमाणे राखीव आसनासंबंधीच्या सूचना संबंधित आसनांच्या मागील बाजूला ठळक अक्षरात व स्पष्ट दिसतील, अशा पध्दतीने प्रदर्शित कराव्यात, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)


राज्य परिवहन महामंडळातर्फे ६५ आसनी एस. टी.त चालकाच्या शेजारी असलेल्या वाहकाच्या जागेबाबत विरोध कायम राहिल्याने पुढील काळात एस. टी. याबाबत कोणता निर्णय घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. प्रवाशांची सुरक्षितता पाहणे हे महत्त्वाचे असून त्यासाठी आता वाहकांना लढा द्यावा लागत आहे.

एसटीबसेसमध्ये सुधारित आसन रचना, वाहकांचाही आसनव्यवस्थेत समावेश.
६५ आसनी बसेसमध्ये असलेल्या व्यवस्थेबाबत वाहक नाराज.
चालकाच्या शेजारी असलेल्या जागेबाबत विरोध.
आता ही मागणीही मान्य होणार का ?
वाहकांनी केल्या अपेक्षा व्यक्त.

Web Title: Improved seat composition by transport corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.