जिल्ह्यात समर्थ बुथ अभियान राबवा : नीलेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:37 IST2021-09-04T04:37:50+5:302021-09-04T04:37:50+5:30

असगाेली : भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी भाजपचे प्रदेश चिटणीस, माजी खासदार नीलेश राणे यांची मुंबई येथे भेट ...

Implement Samarth Booth Campaign in the district: Nilesh Rane | जिल्ह्यात समर्थ बुथ अभियान राबवा : नीलेश राणे

जिल्ह्यात समर्थ बुथ अभियान राबवा : नीलेश राणे

असगाेली : भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी भाजपचे प्रदेश चिटणीस, माजी खासदार नीलेश राणे यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाबाबत चर्चा केली. जिल्ह्याच्या विकासाकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे नीलेश राणे यांनी यावेळी सांगितले. भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्यादृष्टीने समर्थ बुथ अभियान भक्कमपणे राबविण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

नीलेश राणे यांनी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तोंडावर संघटनेतर्फे राबविण्यात येणारे समर्थ बुथ अभियान सक्षमपणे राबविण्यास जैतापकर यांना सांगितले. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील प्रस्थापितांना जशास तसे उत्तर देण्याकरिता आपण म्हणालात त्या गोष्टीसाठी राणे कुटुंबीय आपल्यासोबत असेल, असेही आश्वासित केले. कोकणवासीयांच्या आशीर्वादाने राणे केंद्रामध्ये मिळालेल्या कॅबिनेट मंत्रीपदाचा फायदा करत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करून बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असेही नीलेश राणे म्हणाले. उत्तर रत्नागिरी शत् प्रतिशत् भाजपमय करण्यासाठी कामाला लागा, असेही राणे यांनी सांगितले. यावेळी बाबा परब, गणेश कसवणकर उपस्थित होते.

Web Title: Implement Samarth Booth Campaign in the district: Nilesh Rane