शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

संजय राऊत मुख्यमंत्रिपदासाठी टपून बसलेत - केंद्रीय मंत्री नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 17:22 IST

२०२४ मध्ये निवडणुकीत आमदारांची २० संख्यासुद्धा शिवसेनेला गाठता येणार नाही

कणकवली : महाराष्ट्रात सत्ता मिळविण्यासाठी १४५ आमदार लागतात. मात्र, आता राज्य सरकारचे सरकार अल्पमतात आले आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे लोकशाहीतील नातेसुद्धा त्यांनी धुळीला मिळवले आहे. त्यांचे सत्तेतील आठ-आठ, नऊ-नऊ आमदार फुटतात, याचा अर्थ त्यांच्यावर आता त्या आमदारांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाजूला व्हावे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी पडवे येथे रविवारी संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते.मंत्री नारायण राणे म्हणाले, राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपने मिळविलेल्या विजयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार नितेश राणे यांचे अभिनंदन करण्यासाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाचा विजय मिळविला आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजप नेत्याच्या श्रमाचे फळ मिळाले. सर्व भाजप आमदारांनी निष्ठेचे दर्शन घडविले. पक्षाप्रति असलेली निष्ठा, श्रद्धा, प्रामाणिकपणा कसा असतो हे आमदार जगताप, आमदार टिळक यांनी आजारी असतानाही मतदान करून दाखवल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी भाषा वापरली, ज्या भाषेत विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली. ती मुख्यमंत्रिपदाला शोभणारी नाही. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले, सावरकर, टिळक, महात्मा गांधी यांच्या राज्यात मुख्यमंत्री जी भाषा वापरतात ती संसदीय नाही. शरद पवार यांनी भाजपच्या विजयाने पराभवाचा धक्का बसला नाही, असे सांगतानाच देवेंद्र फडणवीस यांनी माणसे जपली, आमदार सांभाळले, म्हणून विजय झाला अशी प्रतिक्रिया दिली.

यापुढे ६ सुद्धा खासदार निवडून येणार नाहीतसंजय राऊतांचे अभिनंदन करण्याच्या वृत्तीचे ते नाहीत. मात्र त्यांचे गुरु शरद पवार आहेत. त्यांची प्रतिक्रिया त्यांनी वाचावी. खासदार संजय राऊत हे. मुख्यमंत्रिपदासाठी टपून बसलेले आहेत. त्यांना वाटते आपण मुख्यमंत्री. होणार. मात्र, असे कधीही होणार नाही. यापुढे १८ नाहीच तर ६ सुद्धा खासदार निवडून येणार नाहीत. २०२४ मध्ये निवडणुकीत आमदारांची २० संख्यासुद्धा शिवसेनेला गाठता येणार नाही, असेही मंत्री राणे या वेळी म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNarayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे