पाऊस लांबला तर मृत पाणीसाठा वापरावा लागणार; शीळ धरणातील पाणीसाठा १५ जुलै पर्यंत पुरेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2023 18:12 IST2023-06-18T18:12:40+5:302023-06-18T18:12:51+5:30
रत्नागिरी शहरवासियांना पुरवठा केल्या जाणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा दि. १५ जुलै पर्यंतच पूरेल.

पाऊस लांबला तर मृत पाणीसाठा वापरावा लागणार; शीळ धरणातील पाणीसाठा १५ जुलै पर्यंत पुरेल
मेहरून नाकाडे
रत्नागिरी : रत्नागिरी शहरवासियांना पुरवठा केल्या जाणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा दि. १५ जुलै पर्यंतच पूरेल. तोपर्यंत पाऊस पडला तर ठीक आहे, अन्यथा धरणातील मृत पाणीसाठा वापरावा लागणार आहे. त्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून नियोजन सुरू आहे. रत्नागिरी शहरात १० हजार ५०० जोडण्या असून १८ ते १९ दशलक्षघनमीटर पाण्याची आवश्यकता भासते. शहरवासियांची पाण्याविना गैरसोय होऊ नये यासाठी गेले दोन महिने एक दिवसा आड पाणी पुरवठा शहरात सुरू आहे.
चक्रीवादळामुळे पाऊस लांबला आहे. सध्या शीळ धरणात ०.३४३ दशलक्षघनमीटर जीवंत पाणीसाठा आहे. याच पाणीसाठ्यामधून शहदक्षिण पॅसिफिक महासागरातील ‘अल् निनो’ या समुद्र प्रवाहाच्या सक्रीयेतूमुळे देशातील मान्सून पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविल शहराला एकमेव शीळ धरणातून पाणीपुरवठा सुरू आहे. तीव्र उन्हामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने शीळ धरणातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. पर्जन्यमान कमी झाल्यास जुलैपर्यंत पाणीपुरवठा एक दिवसाआडच होईल. असे नियोजन केले आहे. मात्र तत्पूर्वी जिल्ह्यात मान्सून सक्रीय होणे गरजेचे आहे.
‘अल् निनो’ च्या प्रभावामुळे एप्रिलपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. बाष्पीभवनामुळे पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. सध्या शीळ धरणात ०.३४३ दशलक्षघनमीटर जीवंत पाणीसाठा असून दि.३० जूनपर्यंत पुरेल. चांगला पाऊस न झाल्यास गरज ओळखून मृत पाणीसाठा वापरावा लागणार आहे. - तुषार बाबर, मुख्याधिकारी