शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

मी पळून गेलो नाही, आदित्य ठाकरेंना फोन करुन गेलो; बंडखोर आमदार योगेश कदमांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 19:32 IST

अनिल परब यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून माझे अस्तित्व संपवण्यासाठी गेले सहा महिने माझे खच्चीकरण केले.

खेड : जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून माझे अस्तित्व संपवण्यासाठी गेले सहा महिने माझे खच्चीकरण केले. त्यामुळेच शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला, असे स्पष्ट मत आमदार योगेश कदम यांनी खेड येथे पत्रकार परिषदेत मांडले. मात्र, मी पळून गेलो नाही तर आदित्य ठाकरे यांना फोन करून मगच गुवाहाटीला गेलो, असे त्यांनी स्पष्ट केले.शिंदे गटात सामील झाल्यानंतर आमदार याेगेश कदम प्रथमच शनिवारी खेडमध्ये दाखल झाले हाेते. खेड शहरातील योगिता डेंटल कॉलेज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, मी आजही शिवसैनिकच आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे माझे आजही कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. परंतु, तत्कालीन पालकमंत्री अनिल परब आणि पक्षप्रमुखांच्या आजूबाजूला असणाऱ्या चौकडीमुळे मला हा निर्णय घेणे भाग पडले.दापोली नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावरच तालुकाप्रमुखांसह सर्वच पदाधिकाऱ्यांना बाजूला सारून या ठिकाणी राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची वर्णी लावण्यात आली. शिवसेनेच्या स्थानिक आमदाराला डावलून पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदारांकडे आणि नेहमीच शिवसेनेच्या विरोधात बोलणाऱ्या माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे निवडणुकीची सुत्रे दिली.राष्ट्रवादीकडून त्यांच्या पक्षाच्या पराभूत उमेदवारांना देण्यात येणारे बळ, त्यामुळे शिवसैनिकावर होणारा अन्याय वेळोवेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, स्थानिक नेतृत्व खासदार विनायक राऊत यांच्या कानावर घालूनही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. मी शिवसेना म्हणूनच पुढील निवडणूक लढणार व जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासमवेत तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील शिवसेनेचे पदाधिकारी, खेड पंचायत समितीचे माजी सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि खेड नगरपरिषदेचे निवडक माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाAditya Thackreyआदित्य ठाकरेYogesh Kadamयोगेश कदम