शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात लवकरच हायड्रोजन पॉलिसी जाहीर करणार, उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 17:13 IST

रत्नागिरी : अमेरिकेच्या शिष्टमंडळाबरोबर गुरूवारी रात्री झालेल्या बैठकीत महाराष्ट्रात हायड्रोजन पॉलिसी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही पॉलिसी ...

रत्नागिरी : अमेरिकेच्या शिष्टमंडळाबरोबर गुरूवारी रात्री झालेल्या बैठकीत महाराष्ट्रात हायड्रोजन पॉलिसी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही पॉलिसी राबविल्यास हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या, स्कूटर्स एवढेच नव्हे तर सागरी मार्गावरील बोटीही तयार होतील. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. येत्या ८ - १५ दिवसांत ही हायड्रोजन पॉलिसी तयार करण्यात येणार आहे. यासाठी एक टीम थोड्याच दिवसांत रत्नागिरीत येणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण एच. पुजार उपस्थित होते.ड्रायड्रोजन पॉलिसीसंदर्भात माहिती देताना मंत्री सामंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॅशनल हायड्रोजन मिशन चालविण्याचा निर्णय घेतला असून, त्याला महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदाच प्रतिसाद दिला आहे. इलेक्ट्रिकल वाहनांप्रमाणेच आता हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या, स्कूटर्स तयार होतील. यासाठी अमेरिकेशी चर्चा करून करार केला जाणार आहे. येत्या आठ - पंधरा दिवसांत हायड्रोजन पाॅलिसी जाहीर करण्यात येणार आहे.जपानमधील सुमिटोमो या कंपनीचे मुंबईत लवकरच कार्यालय उभारण्यात येणार आहे. कार्यालय बांधल्यानंतर या कंपनीच्या माध्यमातून परदेशातील माेठमोठे उद्योग महाराष्ट्रात येण्यास सुरूवात होईल. याचा जिल्ह्यालाही मोठा फायदा होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

ते म्हणाले, या कंपनीने २०११ कोटी रुपयांची जमीन कार्यालयासाठी मागितली होती. मात्र, अडीच वर्षात या कंपनीला एक इंचही जागा मिळाली नाही. मात्र, ही बाब खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांना कळताच त्यांनी दहा दिवसांत एमएमआरडीएच्या माध्यमातून २,०६५ कोटी रुपयांची  ११,८८७ चाैरस फूट जागा ८० वर्षांसाठी जपानच्या कंपनीला देण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे या कंपनीने मुंबईत हे कार्यालय बांधल्यानंतर दीड हजार लोकांना थेट रोजगार मिळणार असून, ४ ते ७ हजार लोकांना अप्रत्यक्षरीत्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत