पतीने हॉकी स्टिकने मारहाण करून डांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 23:20 IST2017-08-07T23:20:39+5:302017-08-07T23:20:39+5:30

Husband hit the stick with a stick | पतीने हॉकी स्टिकने मारहाण करून डांबले

पतीने हॉकी स्टिकने मारहाण करून डांबले



लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : पतीने हॉकी स्टीकने बेदम मारहाण करून कोंडून ठेवल्याची तक्रार रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती आणि मिºया गावच्या सरपंच स्वप्नाली सावंत यांनी केली आहे. मारहाणीत सावंत जखमी झाल्या असून, त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुकांत सावंत हे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख आहेत.
गेले काही दिवस पती-पत्नीमध्ये खटके उडत होते. त्यातूनच रविवारी पती सुकांत यांनी आपल्याला हॉकी स्टीकने मारहाण केली आणि त्यानंतर खोलीत डांबून ठेवले, असा आरोप स्वप्नाली सावंत यांनी केला.
रात्र जागून काढली!
रविवारची रात्र त्या खोलीतच जागून काढली. महत्प्रयासाने आपण सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास आपली झाडगाव येथील बहीण अक्षता सावंत हिच्याकडे गेलो. मात्र, मागावर असलेल्या पती सुकांत सावंत यांनी तेथे येऊन त्या घराचा दरवाजा लाथेने उघडला आणि तेथेही आपल्याला मारहाण केली. सततच्या मारहाणीमुळे उठताही येत नव्हते. मात्र कशीबशी जिल्हा रुग्णालयापर्यंत येऊन दाखल झाले, असे सावंत यांनी पोलिसांना सांगितले. स्वप्नाली सुकांत सावंत या रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत. सावंत यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मारहाणीमागचे कारण समजू शकले नाही. सुकांत सावंत यांच्यावर याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Husband hit the stick with a stick