40 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका

By Admin | Updated: March 17, 2017 13:03 IST2017-03-17T13:03:29+5:302017-03-17T13:03:29+5:30

रत्नागिरीतील दापोली येथे 40 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

Hundreds of 40 feet deep well rid of the leopard | 40 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका

40 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका

ऑनलाइन लोकमत

रत्नागिरी, दि. 17 - दापोली येथे 40 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.  तालुक्यातील जालगाव कुंभारवाडी येथील ही घटना आहे. गुरुवारी रात्री भक्ष्याचा पाठलाग करताना हा बिबट्या एका घराशेजारील 40 फूट खोल विहिरीत पडला. 
 
विहिरीच्या बाजूने कोणाचा तरी आवाज एकू असल्याने घरमालकाने सकाळी उठून विहिरीत डोकावून पाहिलं तर त्यात बिबट्या असल्याचे निदर्शनास आले.  यानंतर त्यांनी तातडीने वन विभागाला पाचारण केले. 
 
वनविभागाने घटनास्थळी दाखल होत पिंजरा विहिरीत सोडला. यानंतर तब्बल दोन तासांनंतर बिबट्याची सुटका करण्यात आली. स्थानिक, पोलीस, वन कर्मचा-यांनी या बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढला. दरम्यान, हा बिबट्या दोन वर्षांचा असल्याचा अंदाज आहे. 
 
दरम्यान, या घटनेत त्याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. 
 

Web Title: Hundreds of 40 feet deep well rid of the leopard