शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

‘जलयुक्त शिवार’मुळे केतकी स्वयंपूर्ण

By admin | Updated: July 8, 2016 01:03 IST

वळण अन् सिमेंट बंधारे : लागवड वाढली, गाव टँकरमुक्त

चिपळूण : जलयुक्त शिवार अभियान या महत्त्वाकांक्षी योजनेत २०१५ - १६मध्ये निवड झालेल्या केतकी गावात करण्यात आलेल्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, गतिमान पाणलोट (जलयुक्त शिवार अभियान) लोकसहभाग व सी. एस. आर.अंतर्गत लोकसहभागातील कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली, तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या फळबाग व वृक्ष लागवड, मृद व जलसंधारणाच्या सलग समपातळीतील चर, अनगड दगडी बांध, वळण बंधारे, सिमेंट बंधारे, शेततळे आदींमुळे केतकी गाव टँकरमुक्त झाला आहे. त्याचबरोबर रब्बी हंगामातील कडधान्य पिकाखालील क्षेत्र वाढ व खरीप हंगामात भातपिकाच्या लावणीसाठी जलयुक्त शिवार अभियानातील वळण बंधारे उपयुक्त असल्याचे दिसून येत आहे. कोकणात दरवर्षी सरासरी ४५०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडतो. परंतु दऱ्याखोऱ्यातील, डोंगरातील हे सर्व पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळत असल्याने जानेवारी महिन्यापासूनच पाण्याची टंचाई जाणवते. परंतु, केतकी गावी या अभियानाअंतर्गत २०१५-१६ मध्ये केल्या गेलेल्या मृद संधारणाच्या जलस्रोत बळकटीकरण, बोअरवेल्स, फळबाग व वृक्ष लागवड व २०१६ - १७मध्ये चार वळण बंधारे, सिमेंट बंधारे बांधल्याने पावसाचे लाखो लीटर पाणी अडवले गेले. यामुळे परिसरातील जलस्रोत, विहिरीतील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानातील सिमेंट बंधारे जलस्रोतांमधील निर्माण झालेल्या अतिरिक्त पाण्याचा वापर करुन खरीप हंगामात भातशेतीला पाणी वळवून घेण्याबरोबर या बंधाऱ्यातील पाणी पाऊस संपल्यानंतर रब्बी हंगामात कडधान्यवर्गीय पिके, भाजीपाला पिकासाठी वापरून रब्बी हंगामात पिकाखालील क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. केतकी येथे कृषी विभाग, महसूल विभाग, एक्सेल कपंनी व शासनाच्या विविध विभागाच्या समन्वयाने पाणी आडवा, पाणी जिरवा हा उपक्रम यशस्वीपणे राबवणार असल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे यांनी कृषी जागृती सप्ताहअंतर्गत कृषी विभागातर्फे आयोजित सिमेंट बंधाऱ्यातील जलपूजन कार्यक्रमावेळी केतकी येथे व्यक्त केले. (प्रतिनिधी)दादा गरंडे : ग्रामस्थांचा सहभाग, पाणलोट समितीच्या सहकार्याने योजना पूर्णत्त्वास...जलयुक्त शिवार अभियान राबवताना कृषी विभागासोबत स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग, श्रमदान, पाणलोट समिती, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांचे सहकार्य मिळाल्याने जलस्वराज्य योजना यशस्वीरित्या पूर्णत्त्वास जात आहे. केतकी गावात राबवत असलेल्या सर्वसमावेशक योजना इतरही गावात राबवून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कालुस्ते येथील कृषी सहाय्यक दादा गरंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.केतकी गावात पाणलोट व जलयुक्त शिवार अभियानातील वेगवेगळ्या कामामुळे यावर्षी पाण्याची टंचाई भासली नाही. तसेच या अभियानात कृषी विभाग सीएसआरअंतर्गत व गावातील लोकसहभागातून केलेली विविध कामे यामुळे निर्माण झालेल्या पाणीसाठ्याचा रब्बी पिकासाठी वापर होत आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात वाढ करून येथील शेतकरी उत्पन्न घेत आहेत, असे सरपंच समीक्षा गोंधळेकर यांनी सांगितले.