उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:30 IST2021-04-10T04:30:20+5:302021-04-10T04:30:20+5:30
फोटो कॅप्शन: जिल्हा पाेलीस दलातील सरकारी अभियोक्ता मेघना एस.नलावडे यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.मोहीतकुमार गर्ग यांनी सन्मान केला. (छाया ...

उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान
फोटो कॅप्शन: जिल्हा पाेलीस दलातील सरकारी अभियोक्ता मेघना एस.नलावडे यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.मोहीतकुमार गर्ग यांनी सन्मान केला. (छाया : तन्मय दाते)
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : रत्नागिरी येथे फेब्रुवारी, २०२१ मध्ये उल्लेखनीय काम करणारे पोलीस अधिकारी, अंमलदार, तसेच पोलिसांना सहकार्य करणाऱ्यांचा जिल्हा पाेलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांच्याहस्ते प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा पाेलीस मुख्यालयात काेविडचे नियम पाळून या साेहळ्याचे आयाेजन करण्यात आले हाेते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ‘फेम इंडिया मॅगझिन अॅन्ड एशिया पोस्ट’ या नियतकालिकेमध्ये फिफ्टी पॉप्युलर डिस्ट्रिक पोलीस कॅप्टन २०२१ मध्ये डॉ.मोहित कुमार गर्ग यांचा समावेश केल्याने रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर, गुन्ह्यातील शवविच्छेदन अहवाल तत्काळ देऊन पोलीस दलाला सहकार्य करणारे जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.कुमरे, सरकारी पक्षाच्या बाजूने उत्तमरीत्या बाजू मांडल्याने दापोली पोलीस स्थानकातील गुन्ह्यांमधील आरोपी सचिन मिसाळ व अन्य आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा मिळवून देणाऱ्या सरकारी अभियोक्ता मेघना एस.नलावडे, तसेच पोलिसांना सहकार्य करून उत्कृष्ट काम करणाऱ्या शिरगावच्या पोलीस पाटील पूजा शिंदे आणि दाभोळ कार्यक्षेत्रामध्ये कोविड १९ मध्ये पोलीस दलाला सहकार्य करणाऱ्या १३ नागरिकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस उपअधीक्षक (गृह) एस.एल. पाटील, सचिन बारी, शशिकिरण काशिद, निवास साळोखे, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकांमधील प्रभारी अधिकारी उपस्थित होते.