शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मानधनाबाबत होमगार्डची उपेक्षा

By admin | Updated: October 19, 2015 23:51 IST

महत्त्व वाढले : पण सन्मान नाही...

खेड : राज्यातील वाढत्या दहशतवादाला तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दल कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आज गृहरक्षक दलाचे महत्व वाढले आहे. मात्र, आजही राज्य सरकारकडून गृहरक्षक दलाची उपेक्षा सुरु आहे.आपदग्रस्त परिस्थिती तसेच विविध धार्मिक सणांसाठी होमगार्डना कर्तव्यावर बोलावले जाते. यावेळी कर्तव्यावर असतानाचा भत्ता दिला जातो. मात्र, हा कालावधी सोडल्यास होमगार्डना घरीच बसावे लागते. त्यांना मजुरीची कामेही वेळेवर मिळत नाहीत. होमगार्डच्या भत्त्यामध्ये वाढ करण्याचे आश्वासन यापूर्वी देण्यात आले होते. तसेच धुलाई भत्ता वाढवण्याचीही जाहीर घोषणा करण्यात आली होती. मात्र, अद्याप होमगार्डना यापैकी कोणत्याही सुविधेचा लाभ मिळालेला नाही.आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या होमगार्डना ‘ना मान ना धन’ अशा स्थितीत काम करावे लागत आहे. शासकीय कर्तव्यावर असताना पोलिसांप्रमाणेच दिवसरात्र कर्तव्य पार पाडावे लागते. ज्या पोलीस हवालदारांसमवेत त्यांन कर्तव्यावर पाठवण्यात आले असेल, त्यांची खासगी कामेही करावी लागतात़ अनेक ठिकाणी पानसुपारी आणण्यापासून ते चहावाल्याला चहा आण म्हणून सांगण्यासाठी होमगार्डचा वापर केला जात आहे. कर्तव्य पोलिसांप्रमाणे असले तरी त्यांच्याप्रमाणे अधिकार नसल्याने होमगार्डस्ना मागासलेपणाची जाणीव होत राहते. होमगार्डना पगार देतानाही सरकार हात आखडता घेत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. होमगार्डना प्रतिमहिना निश्चित समाधानकारक मानधन मिळाल्यास तसेच उपलब्ध सर्व भत्ते वेळेवर आणि आवश्यक प्रमाणात मिळाल्यास होमगार्डना कुटुंबाचा चरितार्थ चालवणे सुलभ होईल. आता याकामी शासनाने पुढाकार घेऊन होमगार्डना न्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)कामाचा जोर : कामही वेळेवर मिळेनागृहरक्षक दलाची व्यथा न सांगण्यापलिकडची झाली आहे. कारण वेळेवर काम मिळत नाही. मानधन तर पुरेसे मिळतच नाही. जेव्हा गरज लागेल, तेव्हा हक्काने गृहरक्षक दलाची मदत मागितली जाते. पण त्यामानाने मानधन खूपच कमी मिळते. अगदी सणाच्या काळात सुरक्षा यंत्रणेवर ताण येतो. त्यावेळी गृहरक्षक दलाचे जवान सण मागे सारून संरक्षणासाठी पुढे येतात.मात्र, तरीही हे दल उपेक्षितच आहे.लक्ष कधी देणार?गृहरक्षक दलाच्या या समस्या वारंवार वरिष्ठ स्तरावर मांडण्यात आल्या आहेत. मात्र, त्यावर अद्याप कोणीच गांभीर्याने विचार केलेला नाही.