उंबरशेत येथे घरफाेडी, ३ लाखांचा ऐवज चाेरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:30 IST2021-05-15T04:30:34+5:302021-05-15T04:30:34+5:30

दापोली : तालुक्यातील उंबरशेत येथे गुरुवारी रात्री अज्ञाताने घराच्या पुढील दरवाजाचे कुलूप फोडून सुमारे २ लाख ७५ हजार रुपयांचे ...

Home burglary at Umbarshet, Rs 3 lakh stolen | उंबरशेत येथे घरफाेडी, ३ लाखांचा ऐवज चाेरीला

उंबरशेत येथे घरफाेडी, ३ लाखांचा ऐवज चाेरीला

दापोली : तालुक्यातील उंबरशेत येथे गुरुवारी रात्री अज्ञाताने घराच्या पुढील दरवाजाचे कुलूप फोडून सुमारे २ लाख ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ७० हजार असा एकूण ३ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबतची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंबरशेत येथील सुनील सोनू गोरीवले हे आपल्या पत्नीसह १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजता मांदिवली येथे गेले होते. शुक्रवारी सकाळी ते परत आले असता त्यांना घराचे दरवाजाचे कुलूप फोडलेले दिसले़ त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चाेरीला गेल्याच दिसले़ याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निनाद कांबळे करत आहेत.

Web Title: Home burglary at Umbarshet, Rs 3 lakh stolen