शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

रत्नागिरीत मुसळधार पाऊस; रघुवीर घाटात दरड कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 23:52 IST

राजापूरमध्ये अर्जुना आणि कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. लांजा तालुक्यातील जावडे येथील वहाळाला पूर आल्यामुळे रावारी व बापेरे तेलीवाडी या गावांचा तालुक्याचा संपर्क तुटला आहे.

ठळक मुद्देनद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

 रत्नागिरी : सलग दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाचा जिल्ह्याला चांगलाच फटका बसला आहे. या पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजापूरमध्ये अर्जुना आणि कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

लांजा तालुक्यात रस्त्यांवर पाणी आल्यामुळे अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. अर्थात या पावसामुळे शेतीच्या कामांनी मात्र वेग घेतला आहे. आज, शुक्रवारी आषाढी एकादशी असल्याने पाऊस अधिक जोर घेणार, असा अंदाज आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री जगबुडी आणि वाशिष्ठी पुलांवरून बंद करण्यात आलेली वाहतूक गुरुवारी सकाळी पूर्ववत झाली आहे. मंगळवारपासून सुरू झालेला पाऊस गुरुवारीही दिवसभर सुरू होता. गुरुवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे राजापूर शहरातील अर्जुना नदी आणि कोदवली नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. बाजारपेठेतील रस्त्यावर पाणी आले. नगर परिषदेने सतर्कतेचा भोंगा वाजविल्यानंतर राजापुरातील सर्व शाळा तत्काळ सोडून देण्यात आल्या. वाढत्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. पाणी वाढत असल्याचे लक्षात आल्यामुळे व्यापाºयांनी तातडीने दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलविला.

रघुवीर घाटात आकल्पे गावानजीक दरड कोसळल्यामुळे रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांचा संपर्क तुटला. बुधवारी रात्री ही दरड कोसळली. सातारा जिल्ह्यातील १५ गावांचा खेड तालुक्याशी संपर्क असतो. या गावांशी आता पूर्ण संपर्क तुटला आहे. खेडचे तहसीलदारशिवाजी जाधव यांनी तेथे भेट दिली असून, दरड हटविण्याचे काम वेगात सुरू झाले आहे. मुसळधार पावसाचा फटका लांजा तालुक्यातील जावडे येथील वहाळाला पूर आल्यामुळे रावारी व बापेरे तेलीवाडी या गावांचा तालुक्याचा संपर्क तुटला आहे.

येथील जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त झालेल्या गेल्या २४ तासांतील प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्यात आतापर्यंत १२७७ मिलिमीटर एवढी एकूण पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत खेडमध्ये सर्वाधिक १४१ मिलिमीटर, तर त्या खालोखाल संगमेश्वर (१२३ मिलिमीटर), दापोली (११६ मिलिमीटर) तालुक्यात पाऊस झाला आहे. आतापर्यंत मंडणगडमध्ये सर्वाधिक (१७१४ मिलिमीटर) पाऊस झाला असून, सर्वांत कमी पाऊस रत्नागिरी तालुक्यात (८७९ मिलिमीटर) झाला आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडे गुरुवारी सकाळी आलेल्या प्राथमिक अहवालानुसार, खेड तालुक्यात हेदली येथील मोहन घाणेकर यांच्या घराचे अंशत: ६,५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. चिपळूण तालुक्यात कळंवडे येथील तुकाराम वरपे आणि दिनशाद चौघुले यांच्या घरांचे अशंत: नुकसान झाले आहे. वाशिष्ठी नदीच्या नदीच्या पातळीत बुधवारी रात्री वाढ झाल्याने पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पाणी कमी झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. गुहागर तालुक्यातील दाभोळ येथील दीपक पितळे यांच्या घराचे अंशत: ४,५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील नाझिम काझी यांच्या गाडीवर झाड पडल्याने ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसriverनदी