शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आंब्यावर उष्माघाताचा आघात, आंबे खराब होऊन गळू लागले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 14:29 IST

मे महिन्यात आंब्याची कमतरता भासणार

रत्नागिरी : हापूस आंब्याला सततच्या बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. कोकणात तापमानवाढीमुळे झालेल्या उष्माघाताचा फटका आंब्याला बसला आहे. बहुतांश ठिकाणी आंब्यावर डाग उठल्याने आंबे खराब होऊन गळू लागले आहेत. काही ठिकाणी उष्माघातामुळे फळ पिवळे पडत आहे. त्यामुळे गळ माेठ्या प्रमाणात हाेत असून, बागायतदारांचे आर्थिक गणित विस्कटले आहे.लांबलेला पावसाळा आणि उशिराने सुरू झालेली थंडी यामुळे हापूस काहीसा उशिराने मोहरला. त्यानंतरही या मोहरावर थ्रीप्स आणि तुडतुडा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला. परिणामी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागली. अशा परिस्थितीमध्ये काही प्रमाणात हापूस हाताशी लागेल अशी आशा बागायतदारांची होती. पण सध्या वातावरणात उष्मा वाढला असून, त्याचा परिणाम आता हापूसवर जाणवत आहे.सध्या झालेल्या फळधारणापैकी जवळपास ७५ टक्के हापूस हा गळून पडत आहे. त्यामुळे बागायतदारांचा यंदाचा हंगाम आर्थिक कसरतीचा ठरण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानामुळे हापूस आंब्याला फटका बसत आहे. रोगामुळे नाइलाजाने औषधांची फवारणी करावी लागते. मार्चमध्ये असलेला आंबा जास्तीत जास्त एप्रिल महिन्याच्या १० तारखेपर्यंत मिळेल.त्यानंतर आणि मे महिन्यात आंब्याची कमतरता भासेल. शेवटच्या मोहरावर अपेक्षा होत्या. मात्र, त्यावरही वातावरण बदलाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाढत्या उष्णतेने वाया जाईल का, असा प्रश्न बागायतदारांसमाेर आता उभा राहिला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाweatherहवामान