शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस थांबताच वाढला उकाडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 16:53 IST

८ जूनपर्यंत जिल्ह्यात पावसाची विश्रांती राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज

रत्नागिरी : जिल्ह्यात २९ मे पासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घैतली आहे. पण पावसाने उसंत घेताच उकाड्यात वाढ होऊ लागली आहे. रविवारी आणि सोमवारी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. मात्र, त्यामुळे गारवा येण्याऐवजी अधिकच उकाडा वाढला.पावसाने मे महिन्याच्या २० तारखेपासून जिल्ह्यात काही ठिकाणी पडण्यास सुरुवात केली. २१ मेपासून पावसाची संततधार सुरू झाली. काही तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने शेतजमिनीत पाणी भरले. जिल्ह्यातील नद्या, धरणे यांची पात्रे वाढली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ३१ मेपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले.त्यातच केरळमध्ये मान्सून वेळेआधी दाखल झाल्याचेही हवामान खात्याने जाहीर केले. त्यामुळे ५ जूनपासून मान्सून नियमित होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. सलग पडणाऱ्या पावसाने आतापर्यंतच्या कालावधीतील मे महिन्याचा उच्चांक गाठला होता. आतापर्यंत मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात यावर्षी पडलेल्या पावसाची वेगळी नोंद झाली.मात्र, २९ मेपासून पाऊस पूर्णपणे थांबला आहे. त्यामुळे पुन्हा कडक ऊन पडायला सुरुवात झाली असून उष्माही वाढला आहे. २६ ते २७ अंशावर पोहोचलेले कमाल तापमान आता पुन्हा ३२ ते ३३ अंशापर्यंत वाढले आहे. त्यामुळे पुन्हा उकाड्याला सुरुवात होऊ लागली आहे.हवामान खात्याने १ आणि २ जून रोजी किरकोळ पावसाची शक्यता व्यक्त केली होती. या दोन दिवसात अगदीच किरकोळ सरी पडल्या. त्यामुळे उकाडा अधिकच वाढला आहे. सध्या ८ जूनपर्यंत जिल्ह्यात पावसाची विश्रांती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसTemperatureतापमान