शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अति घाईत मृत्यूच्या दारात पाय! रेल्वे थांबण्याआधीच उतरायला गेला अन् मरता मरता वाचला; रत्नागिरी स्थानकातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 15:37 IST

जखमी तरुणाला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले

रत्नागिरी : चालत्या गाडीतून उतरणे एका तरुणाच्या चांगलेच अंगाशी आले. उतरताना घसरून पडल्याने तो रेल्वेखाली जाणार होता. मात्र त्याचे नशीब बलवत्तर असल्याने त्याचा जीव वाचला. कोकण रेल्वेच्यारत्नागिरी स्थानकात आज शनिवारी मोठी दुर्घटना घडताना सुदैवाने टळली.चालत्या ट्रेन मधून बेजबाबदारपणे उतरणारा तरुण खाली पडला आणि ट्रेन खाली जात होता. पण प्लॅटफॉर्मवर सेवेत असलेल्या दोन आर.पी.एफ जवानांच्या आणि एक विक्रेत्याच्या सतर्कतेने त्याचे प्राण वाचले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.आज शनिवारी सकाळी एल टी टी - सावंतवाडी गाडी ६ वाजून ४१ मिनिटांनी रत्नागिरी प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर दाखल झाली. मात्र ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबण्यापूर्वीच यातील एका तरुणाने ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला. या चुकीच्या प्रयत्नांत हा तरुण चालत्या ट्रेनच्या खाली येणार होता. पण तो पडताच प्लॅटफॉर्मवर कार्यरत असलेल्या कोकण रेल्वेच्या दोन आर पी एफ जवानांनी आणि एका  विक्रेत्याने सतर्कता दाखवत त्याला वेगाने बाजूला ओढले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले.कोकण रेल्वेचा आर.पी.एफ जवान रणजीत सिंह आणि महेंद्र पाल तसेच विक्रेता वीर सिंग यांनी त्याला वेळीच ओढत ट्रेन खाली जाण्यापासून वाचवले. त्याच्या बरोबर प्रवास करीत असलेल्या प्रवाशांकडून मिळालेल्या माहिती नुसार हा तरुण गोळप रत्नागिरी येतील असल्याची माहिती पुढे आली आहे. या जखमी तरुणावर कोकण रेल्वेच्या पथकाने तत्काळ प्रथमोपचार केले आणि पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.प्लॅटफॉर्म वर कार्यरत दोन आर पी एफ व विक्रेत्यांनी समय सूचकता दाखवत केलेल्या हालचालीमुळे केवळ त्याचे प्राण वाचले. या घटनेची दखल कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी तिघांचे ही विशेष कौतुक केले आहे. संतोष कुमार झा यांनी या तिघांना ही प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अवॉर्ड जाहीर करून ते तत्काळ त्यांना प्रदान करण्यात आले आहे.