शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

हापूसचा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:13 PM

अवीट गोडी असणाºया हापूस आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. पावसाने सवड दिल्याने शेतकरी बांधवही आंबा काढण्याच्या कामामध्ये व्यस्त आहेत. वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये

ठळक मुद्देकिलोवर आंबा घालता अन्य खर्च वाचत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत आंबा काढणी संपणार आहे.

रत्नागिरी : अवीट गोडी असणाºया हापूस आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. पावसाने सवड दिल्याने शेतकरी बांधवही आंबा काढण्याच्या कामामध्ये व्यस्त आहेत. वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये दर कोसळल्याने शेतकरीबांधव सध्या खासगी विक्रीबरोबर कॅनिंगसाठी आंबा घालत आहेत.

हवामानातील बदलामुळे यावर्षी एकूणच हापूसचे उत्पादन कमी राहिले आहे. अति थंडीमुळे आलेल्या पुनर्मोहोराचा आंबा उत्पादनावर परिणाम झाला. त्यातच सुरूवातीपासून थ्रीप्स, तुडतुडा व बुरशीसारख्या रोगामुळे मार्चपर्यंत शेतकऱ्यांना कीटकनाशकांची फवारणी करावी लागत होती. पहिल्या टप्प्यातील आंबा एप्रिलमध्येच संपला. दुसऱ्या टप्प्यात फारशी फलधारणा नव्हती. परिणामी उत्पन्न किरकोळ होते. तिसऱ्या टप्प्यातील आंब्यावर थ्रीप्स प्रादुर्भाव भरपूर असल्याने फळांचा आकार कमी झाला. सध्या तिसºया टप्प्यातील आंबा काढणी सुरू आहे. १०० ते ३०० रूपये डझन दराने मुंबई मार्केटमध्ये विक्री सुरू असल्याने पॅकिंग, वाहतूक, हमाली, तोलाई खर्च परवडेनासा झाल्याने शेतकऱ्यांनी खासगी किरकोळ विक्री सुरू केली आहे. मुख्य रस्त्यालगत स्टॉल लावण्यात येत असल्यामुळे पर्यटकांकडून खरेदी होत आहे. वर्गवारी करून निवडक आंबा पेट्यामध्ये भरला जातो. उर्वरित आंबा  किलोवर कॅनिंगला घातला जातो. २५ ते २६ रूपये किलो दराने आंबा खरेदी सुरू आहे. किलोवर आंबा घालता अन्य खर्च वाचत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत आंबा काढणी संपणार आहे.

हापूसबरोबर रायवळ, पायरी, केशर, आदी प्रकारचे आंबे विक्रीसाठी येत आहेत. कच्च्याबरोबर पिक्या आंब्याना प्राधान्याने मागणी होत आहे. पर्यटक वाहने थांबवून आंबा खरेदी करीत आहेत. जीआय मानांकन प्राप्त झाल्यामुळे परदेशातूनही आंब्याला मागणी वाढली आहे.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी