शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यातील व्यायामशाळा झाल्या अनलॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 19:36 IST

Gymnasiums, CoronaVirus, Unlock, RatnagiriNews रत्नागिरी जिल्ह्यातील व्यायामशाळा सुरू करण्यासाठी अखेर जिल्हा प्रशासनाने दसऱ्यादिनी परवानगी दिली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांची तब्बल साडेसहा महिन्यांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. या व्यावसायिकांच्या दीर्घकाळसाठी बंद राहिलेल्या जीम आता पुन्हा सुरू होणार आहेत.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाकडून परवानगी तब्बल साडेसहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जीमचालकांना दिलासा

रत्नागिरी : जिल्ह्यातील व्यायामशाळा सुरू करण्यासाठी अखेर जिल्हा प्रशासनाने दसऱ्यादिनी परवानगी दिली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांची तब्बल साडेसहा महिन्यांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. या व्यावसायिकांच्या दीर्घकाळसाठी बंद राहिलेल्या जीम आता पुन्हा सुरू होणार आहेत.२३ मार्चपासून आत्तापर्यंत शासनाला सहकार्य करण्याच्या भावनेने जिल्ह्यातील सर्व जीमचालकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत. जिल्ह्यात सुमारे ५० नोंदणीकृत जीम असून, नव्याने सुरू झालेल्याही काही आहेत. या सर्व जीममध्ये मिळून ५०० - ६०० प्रशिक्षक तसेच अन्य कर्मचारी आहेत. मात्र, साडेसहा महिने व्यवसाय बंद राहिल्याने खर्च भागविणे अशक्य झाले होते. जीममधील कर्मचाऱ्यांचे पगार, जीमचे भाडे, वीजबिल तसेच अन्य खर्च भागवताना या व्यावसायिकांवरच उपासमारीची वेळ आली होती.देशभरात आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सरकारने हळुहळू सर्व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, जीमबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. नागरिकांना सुदृढ ठेवण्याच्या भावेनेने अनेकांनी लाखो रूपयांचे कर्ज काढून भाड्याच्या जागेत जीम सुरू केल्या आहेत. पावसाळ्यात तर जीममधील लाखो रूपये किंमतीच्या मशिन्स वापराविना गंजू लागल्या. त्यामुळे या व्यावसायिकांसमोर आर्थिक समस्यांचा डोंगर उभा राहिला होता.अनलॉकची प्रक्रिया देशभर सुरू झाल्यानंतर बहुतांशी उद्योग - व्यवसाय सुरू झाले. अखेर जीमचालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. कोरोनाच्या अनुषंगाने सोशल डिस्टन्सिंगसह सर्व नियम पाळण्याचे शासनाला आश्वासनही दिले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय लवकरच घेण्याचे राज्य जीम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले होते. त्यानुसार अखेर जीम सुरू करण्याबाबत राज्य शासनाने अनुकुलता दाखवली.

शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने व्यायामशाळा चालकांच्या समस्या लक्षात घेऊन अखेर व्यायामशाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे आम्ही सर्व व्यावसायिक त्यांचे ऋणी आहोत.- भाई विलणकर, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा जीम व्यावसायिक असोसिएशन

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकHealthआरोग्यRatnagiriरत्नागिरी