गुजरातमधील मडके विक्रेते चिपळुणात
By Admin | Updated: March 30, 2017 16:28 IST2017-03-30T16:28:29+5:302017-03-30T16:28:29+5:30
मातीच्या मडक्यांना मागणी वाढली

गुजरातमधील मडके विक्रेते चिपळुणात
आॅनलाईन लोकमत
अडरे (जि. रत्नागिरी), दि. ३0 : दिवसेंदिवस उन्हाळा तीव्र होत असल्यामुळे तापमानही ३८ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. मात्र, विज्ञानयुगात आजही मातीच्या मडक्यांना मागणी वाढली आहेत. चिपळूण शहरात गुजरात राज्यातील नारुळ या गावातून मडके विक्रेते आले आहेत.
दिवसेंदिवस तापमान वाढल्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. घशालाही कोरड पडत आहे. त्यामुळे शीतपेयांना मागणी वाढली असून, रसवंतीगृहात ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. महागाई वाढत असल्यामुळे सामान्य माणसाला फ्रीज घेणे परवडत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक अजूनही मडक्यांना पसंती देत आहेत. चिपळूण शहरात सध्या गुजरातमधील नारुळ गावातून १५ विक्रेते आले आहेत. हे विक्रेते दापोली, मंडणगड, रत्नागिरी व ग्रामीण भागापर्यंत मडके विक्री करत आहेत.
सध्या चिपळुणात कपिल देव नामक मडके विक्रेता फिरत आहे. मडक्याचा दर २०० ते २५० रुपयापर्यंत आहे. गेली १५ वर्षे कपिल देव हा चिपळुणात येऊन विक्री करत आहे. गुजरात राज्यातून तयार मडके चिपळुणात आणली जातात आणि हे विक्रेते बहादूरशेख नाका, बाजारपेठ, भेंडीनाका, मुंबई-गोवा महामार्ग, फरशीतिठा आदी ठिकाणी विक्री करीत आहेत. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यात आम्ही हा व्यवसाय करीत असतो. त्यानंतर पावसाळ्यात गावाकडे निघून जातो, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)