चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची गुहागर तालुका कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:29 IST2021-03-20T04:29:49+5:302021-03-20T04:29:49+5:30
टेंभ्ये : गुहागर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा चतुर्थश्रेणी संघाच्या तालुका अध्यक्षपदी कमलाकर बाळू ...

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची गुहागर तालुका कार्यकारिणी जाहीर
टेंभ्ये : गुहागर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा चतुर्थश्रेणी संघाच्या तालुका अध्यक्षपदी कमलाकर बाळू पवार (गुहागर हायस्कूल), तर सचिवपदी मकबूल महंमद पेवेकर (उर्दू हायस्कूल, पेवे) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघाचे अध्यक्ष लक्ष्मण गोरे यांच्या अध्यक्षेतेखाली पाटपन्हाळे हायस्कूल, शृंगारतळी येथे ही सभा झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत शिर्के, जिल्हा सचिव दिनेश वेताळे, जिल्हा सदस्य शशिकांत पवार, समीर खेडेकर, मंगला चावरे, भिकाजी निकम, रत्नागिरी तालुका कार्यकारिणीचे सल्लागार शरद जाधव, चिपळूण तालुका कार्यकारिणीचे खजिनदार सुनील मोरे उपस्थित होते.
नव्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी शंकर घाणेकर (माध्यमिक विद्यालय, आबलोली), खजिनदार म्हणून अनंत कुंभार (सरस्वती विद्यालय, जामसूत) तर सदस्यपदी विनायक पवार (आदर्श विद्यालय, देवघर), काशिनाथ धावडे (माध्यमिक विद्यालय, अडूर), रमेश आंबेकर ( माध्यमिक विद्यालय, शीर) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या सभेला तालुक्यातून ३० ते ३५ चतुर्थश्रेणी कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत शिर्के यांनी केले.
....................
पासपाेर्ट फोटो.
कमलाकर पवार
मकबुल पेवेकर