शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायतींची तब्बल ३ कोटी पाणीपट्टी थकीत, कामांना निधी देणार कोठून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 19:07 IST

रत्नागिरी : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडून मार्चअखेरपर्यंत ८७.६७ टक्के म्हणजेच २१ कोटी ५४ लाख ५१ हजार ७३९ रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात ...

रत्नागिरी : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडून मार्चअखेरपर्यंत ८७.६७ टक्के म्हणजेच २१ कोटी ५४ लाख ५१ हजार ७३९ रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात यश आले आहे. मात्र, अद्यापही तब्बल ३ कोटी २ लाख ९० हजार ६८ रुपयांची पाणीपट्टी वसूल करणे बाकी आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांना पाणी, रस्ते, आरोग्य, वीज, ग्रामपंचायत हद्दीतील अन्य विकासकामे ग्रामपंचायतीमार्फत केली जातात. ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या ग्रामस्थांना पाइपलाइनद्वारे सार्वजनिक ठिकाणी आणि घरोघरी पाणी दिले जाते. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून कर आकारणी केली जाते. जिल्हा परिषदेकडे आलेल्या पाणीपट्टीतून त्या-त्या ग्रामपंचायतीला विकासकामांसाठी निधी वर्ग केला जातो. मात्र, काही ग्रामस्थ पाणीपट्टी वेळेवर भरत नसल्याने पाणीपट्टीची रक्कम थकीत राहते.जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३ कोटी ५४ लाख ३६ हजार ५४४ रुपये पाणीपट्टी थकीत राहिली होती. तर वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षात २१,०३,०५,२६३ रुपये इतकी वसुली अपेक्षित हाेती. त्यातील २१,५४,५१,७३९ रुपये इतकी वसुली झाली असून, अद्यापही ३,०२,९०,०६८ रुपयांची थकबाकी आहे.ग्रामपंचायतीने पाणीपट्टी भरण्यासाठी व्यवस्थापन करणे गरजेचे असते. मात्र, पाणीपट्टी वसुलीकडे ग्रामपंचायातींकडून दुर्लक्ष होत असल्याने थकीत रकमेचा आकडा वाढत आहे. ग्रामपंचायतीने वसूल केलेली पाणीपट्टी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे मार्चअखेरपर्यंत जमा करणे गरजेचे असते; परंतु जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींमध्ये मार्च महिना उलटून गेला तरी अद्याप वसुली पूर्ण झालेली नाही. कराची रक्कम जमा झाली नाही तर निधी कसा मिळणार?

पाणीपट्टी वसुली आणि थकबाकी

  • ग्रामपंचायतींची संख्या - ८४६
  • वर्ष २०२३-२४ ची थकबाकी - ३,५४,३६,५४४
  • चालू मागणी वर्ष २०२४-२५ - २१,०३,०५,२६३
  • एकूण मागणी- २४,५७,४१,८०७
  • एकूण वसुली - २१,५४,५१,७३९
  • येणे शिल्लक - ३,०२,९०,०६८
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायतWaterपाणी