शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बाल विकासासाठी शासनाचा हात आखडता, महिला व बाल विकास विभागाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 15:53 IST

आत्तापर्यंत शासनाने राज्यातील बाल विकास विभागाकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. केंद्राकडून या विभागासाठी पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली असूनही २०१८ - १९ सालासाठी अर्थसंकल्पातील तरतुदींपैकी पहिलाच हप्ता देताना राज्य शासनाने हात आखडता घेतला आहे.

ठळक मुद्देबाल विकासासाठी शासनाचा हात आखडता, महिला व बाल विकास विभागाकडे दुर्लक्ष अर्थसंकल्पाच्या पहिल्या हप्त्यात विविध खर्चांना कात्री, निधी खर्च कुठे होतोय?

शोभना कांबळेरत्नागिरी : आत्तापर्यंत शासनाने राज्यातील बाल विकास विभागाकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. केंद्राकडून या विभागासाठी पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली असूनही २०१८ - १९ सालासाठी अर्थसंकल्पातील तरतुदींपैकी पहिलाच हप्ता देताना राज्य शासनाने हात आखडता घेतला आहे. एवढेच नव्हे तर २०१४ सालच्या तरतुदींचा स्वीकार केला असला तरी विविध बाबींसाठी गेल्या चार वर्षातील फरकांच्या वाढीव रकमेबाबतची तरतूद या वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये केलेलीच नाही.महिला व बाल विकास विभागाकडून एकात्मिक बाल संरक्षण योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी केंद्राकडून ६० टक्के तर राज्य शासनाकडून ४० टक्के तरतूद करण्यात येते. या योजनेंतर्गत प्रायोजकता व बालसंगोपन, बालकांचे परिपोषण (आहार खर्च), बाल विकास समिती, बाल न्याय मंडळाच्या सदस्यांचे मानधन त्याचप्रमाणे बाल संरक्षण कक्षातील कर्मचाऱ्यांच्या वेतन तसेच कार्यालयीन खर्च तसेच अन्य प्रशासकीय खर्च यांचा समावेश आहे.निराधार बालकांचे पालनपोषण करण्यासाठी एखादे कुटुंब पुढे आल्यास त्याचा महिन्याचा खर्च २००० रूपये, त्या कुटुंबाला द्यावेत, असा शासननिर्णय २०१४ साली झाला आहे. यासाठी केंद्र शासनाचा हिस्साही राज्याला मिळत आहे. मात्र, अजूनही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये हा खर्च वितरीत झालेला नाही. शासनाला आपल्याच निर्णयाचा विसर पडल्याचे दिसत आहे.बालकांच्या परिपोषणासाठी यापूर्वी शासनाकडून बालगृहांसाठी ९५० रूपये प्रतिबालक अशी तरतूद होती. मात्र, २०१४ - १५ साली या निर्णयात बदल करून ही रक्कम २००० रूपये प्रतिबालक अशी केलेली आहे. याबाबतचा शासननिर्णय झाला असला तरी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील संस्थांना अजूनही ९५० रूपये याप्रमाणेच परिपोषणाचा खर्च दिला जात आहे. राज्य शासनाला केंद्राकडून हा निधी मिळत आहे तर आत्तापर्यंत राज्याचा हा निधी कुठे खर्च होतो, हे गुलदस्त्यातच आहे.

शासनाने मार्च महिन्यात प्रसिद्ध केलेल्या निर्णयानुसार २०१४ - १५ सालापासून केंद्रीय योजना स्वीकारली आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक बजेट अद्याप मंजूर करण्यात आलेले नाही. थोडक्यात, शासनाकडून बालविकासाची गळचेपी होत असून, देशाचे भविष्य असणाऱ्या बालकांकडेच दुर्लक्ष होत आहे. हे शासनाने आतातरी थांबवायला हवे. या बालकांचा खरा विकास साधायचा असेल तर येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीच्या माध्यमातून ही रक्कम मंजूर करण्यात यावी, अशी अपेक्षा आहे.- अतुल देसाईअध्यक्ष, आभास फाऊंडेशन, कोल्हापूर

राज्यात ३८ बालकल्याण समितीराज्यात एकूण ३८ बालकल्याण समिती कार्यरत आहेत. बाल कल्याण समिती सदस्यांनाही केंद्र सरकारने लागू केलेल्या सुधारीत एकात्मिक बाल संरक्षण योजनेंतर्गत २०१४ -१५ सालापासून मानधन वाढवून ते ५०० रूपयांवरून १००० रूपयांपर्यंत करण्यात आले आहे. केंद्राच्या निधीत याचा समावेश असला तरी राज्याच्या हिश्यात अजूनही ५०० रूपयेच असल्याने सदस्यांना हेच मानधन आजही मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील बाल न्याय मंडळाच्या सदस्यांबाबतही हेच होत आहे.कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात तरतूद नाहीचजिल्ह्यातील बाल संरक्षण कक्षासाठी स्वतंत्र कर्मचारीवर्ग नियुक्त करण्याचे नव्या नियमावलीत नमूद करण्यात आले असले तरी या कर्मचारीवर्गाच्या वेतनासंदर्भात केंद्राकडून तरतूद होऊनही राज्य सरकारने मात्र आताच्या तरतुदीमध्येही हात आखडता घेतला आहे. 

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकासRatnagiriरत्नागिरी