पाणी योजनेचा प्रस्ताव शासनाकडे

By Admin | Updated: March 10, 2016 23:53 IST2016-03-10T23:26:30+5:302016-03-10T23:53:12+5:30

रत्नागिरी नगरपरिषद सभा : सुधारित नळपाणी योजना ६७ कोटींची : मयेकर

Government proposes to plan water scheme | पाणी योजनेचा प्रस्ताव शासनाकडे

पाणी योजनेचा प्रस्ताव शासनाकडे

रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा ६६ कोटी ८७ लाख ९५ हजार ३७३ रुपयांचा प्रस्ताव ८ मार्चला शासनाला सादर करण्यात आला आहे. घनकचरा प्रकल्पाचा १४ कोटी ७० लाख ३४ हजार ४७० रुपयांचा प्रस्तावही त्याचवेळी राज्य शासनाला सादर करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी गुरुवारी झालेल्या रत्नागिरी नगरपरिषदेच्या मासिक सभेच्या सुरुवातीला दिली.
रत्नागिरी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेची वितरण व्यवस्था नाजूक बनली आहे. अंतर्गत जलवाहिन्या जुनाट झाल्याने अनेक ठिकाणी फुटल्या आहेत. या जलवितरण व्यवस्थेची उपग्रहीय पाहणी करून त्याचा अहवालही बनविण्यात आला आहे. मात्र, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत अनेक त्रुटी निर्माण झाल्या आहेत. शहराच्या विविध भागांतील पाणी वितरणात असमतोल निर्माण झाला आहे. त्यामुळेच पाणी वितरण व्यवस्था सक्षम बनविण्यासाठी वाढीव पाणीपुरवठ्याच्या सुधारित योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादरपाणी वितरण व्यवस्था जुनाट
रत्नागिरी शहराला पानवल धरण व शीळ धरणातून मुख्यत्वे पाणीपुरवठा केला जातो. पानवल हे नगरपरिषदेच्या मालकीचे धरण आहे. शीळ धरणातील शंभर टक्के पाणी रत्नागिरी नगरपरिषद पाटबंधारेकडून विकत घेत आहे. दररोज शहराला १५ ते १६ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जातो. त्यातील १२ दशलक्ष घनमीटर पाणी हे शीळ धरणातून दररोज जॅकवेलद्वारे घेतले जाते.
मात्र, वाढती लोकसंख्या व पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता पाणीसाठा पुरेसा असला, तरी जुनाट झालेल्या वितरण व्यवस्थेचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यासाठीच वाढीव पाणी योजनेचा सुधारित प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. करण्यात आला आहे. रत्नागिरी शहरात साडेनऊ हजार नळ जोडण्या असून, वार्षिक पाणी आकारणी अडीच कोटींच्या घरात आहे. वाढत्या बांधकामांमुळे नळ जोडण्यांची मागणी वाढत असून, वितरण व्यवस्था कोलमडल्याने पाणीपुरवठ्यात अनेकदा व्यत्यय निर्माण होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाच्या दुरुस्तीसाठीही साडेआठ कोटींची मागणी करणारा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार आहे.
रत्नागिरी शहरातील घनकचरा प्रकल्प गेल्या पंधरा वर्षांपासून रेंगाळल्याने कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळेच राज्य शासनाच्या निर्देशानुसार १४ कोटी ७० लाखांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष मयेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Government proposes to plan water scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.