दापोलीत पायी दिंडीतून धरणग्रस्तांकडून सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 17:41 IST2019-01-25T17:36:46+5:302019-01-25T17:41:13+5:30
दापोली तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना गेली २० वर्ष जमिनिचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाला जाग आणण्यासाठी पालगड ते दापोली प्रांत कार्यालय दरम्यान शुक्रवारी सकाळी २० किलोमीटरची पायपीट करत पायी दिंडी काढून सरकारचा निषेध केला.

दापोलीत पायी दिंडीतून धरणग्रस्तांकडून सरकारचा निषेध
दापोली : तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना गेली २० वर्ष जमिनिचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाला जाग आणण्यासाठी पालगड ते दापोली प्रांत कार्यालय दरम्यान शुक्रवारी सकाळी २० किलोमीटरची पायपीट करत पायी दिंडी काढून सरकारचा निषेध केला.
तालुक्यातील शिरसाडी, जामगे, गावातील वंचित धरणग्रस्त शेतकऱ्यांची पायी दिंडी निघाली होती. या दिंडीत मोठ्या प्रमाणात धरणग्रस्त महिला व पुरुष शेतकरी सहभागी झाले होते. धरणग्रस्त कुटुंबाला जमिनीचा मोबदला मिळावा, या मागणीसाठी धरणग्रस्त कुटुंबियांनी पूज्य साने गुरुजी यांचे पुतळ्याला हार अर्पण करून पालगड ते दापोली २० किलोमीटर पायी दिंडी काढली.
शिरसाडी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार संजय कदम यानी पाठिंबा दिला आहे. दापोली पंचायत समिती सभापती राजेश गुजर हेदेखील पायी दिंडीत सहभागी झाले होते.