शिक्षक वेतनाबाबत शासन गंभीर नाही

By Admin | Updated: April 10, 2015 00:38 IST2015-04-09T23:20:13+5:302015-04-10T00:38:48+5:30

कपिल पाटील : भरणे येथे जिल्हा भारतीच्या शिक्षक मेळाव्यात मार्गदर्शन

The government is not serious about salary wages | शिक्षक वेतनाबाबत शासन गंभीर नाही

शिक्षक वेतनाबाबत शासन गंभीर नाही

खेड : राज्य सरकार शैैक्षणिक गुणवत्तेच्या नावाने नेहमी बोंब करत असते. त्याकरिता लाखो आणि करोडो रूपयांच्या जाहिराती देऊन शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणावर जोर देते. मात्र, शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याची ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे, त्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचे वेतन आणि इतर प्रश्नावंर सरकार अद्याप गंभीर नाही, असा आरोप शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला आहे.
भरणे येथील नवभारत हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा भारतीच्या शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिक्षक भारतीचे राज्याचे अध्यक्ष अशोक बेलसरे उपस्थित होते़ यावेळी खेड आणि दापोली तालुक्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली़ योग्य निर्णय न घेतल्याबाबत त्यांना दोषी ठरविले. गेली अनेक वर्षे विना अनुदानित शाळांच्या अनुदान प्राप्तकरिता झगडत आहे. विधान परिषदेच्या माध्यमातून हे प्रयत्न करत असून, याला म्हणावे तसे यश प्राप्त झालेले नाही. मात्र, ज्या शाळांना अनुदान प्राप्त ठरवण्यात आले आहे, अशा शाळांना हे अनुदान मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी प्रकाश लाड, सदाशिव सावंत, शंकर जगदाळे यांना मुख्याध्यापक तर धनाजी पाटील यांना उपमुख्याध्यापकपदी बढती मिळाल्याबददल त्यांचा सत्कार करण्यात आला. खेडचे आमदार संजय कदम यांनी आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळांची तसेच शिक्षकांची अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावल्याचे सांगितले.
यावेळी जामगे येथील छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल आणि भडगाव येथील ज्ञानदीप विद्यामंदिर तसेच नवभारत हायस्कूल या प्रशालांना उपक्रमशील शाळा पुरस्कार आमदार संजय कदम यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अनेक शिक्षणप्रेमी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The government is not serious about salary wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.