रत्नागिरीच्या ईशानला आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड स्पर्धेत सुवर्णपदक
By मेहरून नाकाडे | Updated: July 12, 2023 18:53 IST2023-07-12T18:52:33+5:302023-07-12T18:53:35+5:30
रत्नागिरी : रत्नागिरीचा सुपूत्र ईशान सतिश पेडणेकर याने अल अईन (यु.ए.इ.) येथे घेण्यात आलेल्या ३४ व्या इंटरनॅशनल बायोलाॅजी ऑलिंपियाड ...

रत्नागिरीच्या ईशानला आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड स्पर्धेत सुवर्णपदक
रत्नागिरी : रत्नागिरीचा सुपूत्र ईशान सतिश पेडणेकर याने अल अईन (यु.ए.इ.) येथे घेण्यात आलेल्या ३४ व्या इंटरनॅशनल बायोलाॅजी ऑलिंपियाड २०२३ मध्ये सुवर्ण पदक मिळविले आहे. ईशान पेडणेकर याच्या काैतुकास्पद कामगिरीमुळे देशाची तसेच रत्नागिरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड स्पर्धेत यावर्षी प्रथमच भारतातील चारही विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदके मिळवून इतिहास रचला आहे. जागतिक स्तरावरून या मुलांचे कौतुक करण्यात येत आहे. मेघ छाबडा (जालना), ईशान पेडणेकर (रत्नागिरी), ध्रूव अडवानी (बंगळूरू), रोहीत पंडा (छत्तीसगड) सुवर्णपद विजेते ठरले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रो.मदन चतुर्वेदी (दिल्ली), डाॅ.अनुपमा रोनड (मुंबई), डाॅ.व्ही.व्ही.बिनाॅय (बंगळूरू), डाॅ.रामबहादूर सुबेदी (मुंबई) यांचे मार्गदर्शन लाभले.