एक दिवस दिव्यांग बांधवांच्या लसीकरणासाठी द्या : शशिकांत माेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:30 IST2021-04-11T04:30:03+5:302021-04-11T04:30:03+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता चिपळूण शहरातील दिव्यांग बांधवांना लस देण्यासाठी एक दिवस जाहीर करावा, ...

एक दिवस दिव्यांग बांधवांच्या लसीकरणासाठी द्या : शशिकांत माेदी
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता चिपळूण शहरातील दिव्यांग बांधवांना लस देण्यासाठी एक दिवस जाहीर करावा, अशी मागणी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी रत्नागिरी यांच्याकडे नगर परिषदेचे आरोग्य सभापती शशिकांत मोदी यांनी केली आहे.
शहरातील नागरी केंद्रांवर कोरोनाचे वाढते रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी लस देण्यात येत आहे. मात्र, सकाळी ८.३० वाजल्यापासून शहरवासीय तेथे लस घेण्यासाठी रांगेत उपस्थित असतात, त्यामुळे दिव्यांगांना रांगेत उभे राहून लस घेणे शरीराच्या दृष्टीने हानिकारक आहे. त्यामुळे शहरातील सर्व दिव्यांग बांधवांना
सरकारी लस देण्यासाठी एक दिवस जाहीर करावा, जेणेकरून सर्व दिव्यांग एकाच दिवशी लस घेऊ शकतील. त्यामुळे दिव्यांग बांधवांना होणारा त्रास कमी होईल. या विषयाचे
निवेदन आरोग्य सभापती मोदी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले व जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापूरकर व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांना दिले आहे.