शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: राजापुरात डॉक्टरकडून युवतीचा विनयभंग, ग्रामस्थांकडून डॉक्टरला चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 12:28 IST

राजापूर : फॅमिली डॉक्टरनेच तपासणीसाठी आलेल्या युवतीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी राजापुरात घडली. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी ...

राजापूर : फॅमिली डॉक्टरनेच तपासणीसाठी आलेल्या युवतीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी राजापुरात घडली. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी डाॅक्टरवर गुन्हा दाखल केला आहे. डॉ. रंगराव संभाजी पाटील (६९, रा. धोपेश्वर घाटी, राजापूर) असे डाॅक्टरचे नाव आहे.या प्रकाराबाबत राजापूरचे पाेलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या प्रकाराबाबत त्या पीडित युवतीने राजापूर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. या पीडित युवतीला सर्दी व ताप येत होता. यासाठी ती मंगळवारी या डॉक्टरकडे तपासणीसाठी आली होती. मात्र, तरीही तिला बरे न वाटल्याने व अशक्तपणा असल्याने ती पुन्हा बुधवारी सायंकाळी ६ वाजता आपल्या लहान भावासह डॉक्टरकडे गेली हाेती. तापामुळे अशक्तपणा आल्याने तुला सलाईन लावण्याची आवश्यकता असल्याचे सांगून तिला बेडवर झोपायला सांगितले. तिच्या भावाला सलाईनमधून देण्यासाठी लागणारे इंजेक्शन प्रिस्क्रिप्शनवर लिहून देत ते मेडिकलमधून आणण्यास सांगितले.त्यानंतर या पीडित युवतीला सलाईन लावल्यावर या डॉक्टरने तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सलाईन संपल्यावर ही युवती भावासह घरी गेली व तिने सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. या प्रकारानंतर गावातील ग्रामस्थांनी डॉक्टरच्या दवाखान्यावर धडक देत त्याला चोप दिला. त्यानंतर या डाॅक्टरला राजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पीडित युवतीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी डॉ. रंगराव पाटील याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७५ (१) १ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी महिला हेडकाॅस्टेबल हर्षदा चव्हाण अधिक तपास करत आहेत.

‘इन कॅमेरा’ जबाब, डाॅक्टरला नाेटीसया प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पीडित युवतीचा महिला अधिकारी, महिला पोलिस व महिला सरपंच यांच्या उपस्थितीत ‘इन कॅमेरा’ जबाब नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच संबंधित डाॅक्टरचे वय हे ६५ च्या वर असल्याने अटक न करता वेळोवेळी पोलिस तपास व न्यायालयीन प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याच्या सक्त सूचनेची नोटीस देण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdoctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस