शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी ३.० सरकारच्या कॅबिनेटचा फॉर्म्युला ठरला; महाराष्ट्रातून कुणाला मिळणार संधी?
2
भाजपाला २०१ जागांवर पराभूत करणारे 'ते' पक्ष कोणते?; काँग्रेसचा आकडा पाहून चकीत व्हाल
3
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही भाजपच एक नंबरचा पक्ष, पण कसा? फडणवीसांनी सांगितलं...
4
Monsoon Update : महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! मान्सून काही तासांत मुंबईत धडकणार
5
...तर INDIA आघाडीनं आणखी ९ जागा जिंकल्या असत्या; महाराष्ट्रातील ४ जागांचा समावेश
6
"एखादं मंत्रिपद मिळावं म्हणून शिंदे गटाची आदळआपट सुरु"; राजकीय भूकंपावरुन सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर
7
रोहित, विराट यांना मित्रच समज...! शाहीन आफ्रिदीला भारतीय चाहत्यांना प्रेमळ सल्ला, Video 
8
SBIच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; एक्सपर्ट म्हणाले, "१००० च्या वर जाणार..."
9
चीनमधून एक बातमी आली अन् सोनं 'धडाम'...; गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता!
10
"राज्यातला निकाल अनपेक्षित, पवारांनाही चार जागा येतील असं वाटत...." आशिष शेलार स्पष्टच बोलले
11
देवेंद्र फडणवीसांचा मित्रपक्षासह स्वपक्षातील नेत्यांना सल्ला; "आता ही वेळ जाहीरपणे..."
12
Flipkart पूर्वी PhonePe चा येणार आयपीओ, काय आहे प्लॅन; जाणून घ्या
13
'भिंतीवरचं पेंटिंग मिटवशील पण सत्य...?', दलजीत कौरने पुन्हा पतीवर साधला निशाणा
14
जोडी नंबर १! भाऊ-बहिणीची कमाल, होणार डेप्युटी कलेक्टर; सांगितला यशाचा 'सुवर्ण मंत्र'
15
"नितीश कुमारांना इंडिया आघाडीने दिलेली पंतप्रधानपदाची ऑफर"; JDU चा मोठा दावा
16
Dhananjay Munde : "मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा पराभव..."; धनंजय मुंडेंचं जिल्हावासीयांना आवाहन
17
Rahul Gandhi : 'राहुल गांधींना विरोधी पक्षनेते करा', काँग्रेस CWC बैठकीत ठराव मंजूर
18
तुरुंगात होते चंद्राबाबू नायडू, मुलावरही होतं संकट, TDPच्या विजयातील महत्त्वाची व्यक्ती 'ब्राह्मणी' कोण माहितीये?
19
समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक दुसऱ्या ट्रकवर आदळला; एक जण ठार, एक गंभीर
20
मोदी ३.० मंत्रिमंडळात कुणा-कुणाला मिळू शकते जागा, सामोर आली यादी, या नावांची सुरू आहे चर्चा!

परशुराम घाटाची भूवैज्ञानिकांकडून पाहणी, दरड कोसळून एकाचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन झालं जागे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 7:14 PM

परशुराम घाटात दरड कोसळून त्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले

चिपळूण : परशुराम घाटात दरड कोसळून त्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्यानंतर मात्र प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पुणे येथील भूवैज्ञानिकांच्या पथकाने गुरुवारी परशुराम घाटाची पाहणी केल्यानंतर महामार्ग विभागाकडून तांत्रिक माहिती मागितली आहे. तर विशेष म्हणजे येथे १५ फूट उंचीची संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात केली आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात डोंगर कटाई करताना एका कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर सुरक्षेचा मुद्दा एेरणीवर आला आहे. भविष्यात घाटात चौपदरीकरण करताना जीवितहानी होऊ नये. यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने कमालीची खबरदारी बाळगण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर घाटाची पाहणी करण्यासाठी पुणे येथून एस. एम. फाऊंडेशन इंडियाच्या भूवैज्ञानिकांतर्फे घाटात पाहणी केली.यावेळी एम टेक इंजिनिअरिंग जिओ टेक्निशियन विकास माने, मुजुमदार, राष्ट्रीय महामार्ग चिपळूण विभागाचे उपअभियंता प्रकाश निगडे, शाखा अभियंता रॉजर मराठे यांच्यासह ठेकेदार कंपनीचे प्रतिनीधी उपस्थित होते. त्यांच्याबरोबर राष्ट्रीय महामार्गाचे माढकर व ठेकेदार कंपनीचे टीम लीडर मनोज कलांगडे हेही उपस्थित होते. त्यांनी दुर्घटनाग्रस्त भाग तसेच संपूर्ण घाट परिसराची पाहणी केली. येथील मातीही परीक्षणासाठी घेण्यात आली.राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच ठेकेदार कंपनीकडून कामाची माहिती घेतानाच काही तांत्रिक माहिती मागितली आहे. ती माहिती उपलब्ध झाल्यानंतर भूवैज्ञानिक आपला अहवाल संबंधितांना सादर केला जाणार आहे.घडलेली दरड दुर्घटना व घाटाच्या दोन्ही बाजूला असलेली गावे पाहता प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. येथे संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय घेऊन तात्काळ कामाला सुरुवातही करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी संरक्षक भिंतीसाठी आखणी करून सायंकाळी प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली आहे.किमान ७०० मीटरचे अंतर अत्यंत धोकादायक असून , पहिल्या टप्प्यात ३०० मीटर लांबीची आणि सुमारे १५ फूट उंचीची संरक्षक भिंत येथे उभारली जाणार आहे. त्यामुळे येथील गावे धोकामुक्त होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी