शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! मंडणगडात ट्रॅक्टरवर सापडल्या जिलेटीनच्या कांड्या

By मनोज मुळ्ये | Updated: January 19, 2024 13:53 IST

४ लाखाचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

मंडणगड : तालुक्यातील भिंगळाेली येथील एका प्राैढाने ट्रॅक्टरवर लपून ठेवलेल्या जिलेटीनच्या १५४ कांड्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मंडणगड पाेलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला असून, ४ लाख ०२ हजार ७८१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.रतनलाल बाळू रामजी तेली (४३, रा. समर्थनगर भिंगळाेली, मंडणगड, मूळ रा. पहुना, चित्ताेडगड, राजस्थान) असे गुन्हा दाखल केलेल्या प्राैढाचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी सकाळी ७:४५ वाजता करण्यात आली. भिंगळाेली येथील रतनलाल तेली याच्या ट्रॅक्टरवर १५४ जिलेटीनच्या कांड्या ठेवलेल्या हाेत्या. या कांड्या पांढऱ्या प्लास्टिक आच्छादनामध्ये गुंडाळून ठेवलेल्या हाेत्या. त्यावर इंग्रजीमध्ये डेंजरस एक्सप्लाेझिव्ह, टायगर सुपर पाॅवर ९० जाेगनिया एक्सप्ललाेझिव्ह प्रा. लि. गाव हदियाखेरी अॅण्ड कंपनी, जि. भिलवारा, राजस्थान असे लिहिलेले हाेते.तसेच १५ डेटाेनेर सापडले असून, सर्वांच्या एका ताेंडाला इलेक्ट्रीक वायर जाेडलेल्या हाेत्या. तसेच ९ नाेडल कॅपचा सेट, लाल रंगाची १९८ रुपयांची ९ मीटर लांब काेरटेक्स वायरही सापडली आहे. हे सर्व साहित्य ठेवलेला ट्रॅक्टर (आरजे ०९, आरबी १०२३) ही जप्त करण्यात आला आहे.मंडणगड पाेलिसांनी रतनलाल बाळू रामजी तेली याच्याविराेधात भारतीय दंड विधान कायदा कलम २८६ व स्फाेटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ४,५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस