गायत्री जोशीला गणित विषयात मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 15:29 IST2021-01-30T15:27:55+5:302021-01-30T15:29:12+5:30
Education Sector Ratnagiri- देवरुख येथील गायत्री माधव जोशी हिने मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या एमएससी अंतिम परीक्षेत गणित या विषयात सर्वप्रथम येत सुवर्णपदक प्राप्त करण्याचा बहुमान मिळवला आहे. या यशाबद्दल देवरुख वरची आळीतर्फे तिचा नुकताच भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

गायत्री जोशीला गणित विषयात मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक
देवरुख : येथील गायत्री माधव जोशी हिने मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या एमएससी अंतिम परीक्षेत गणित या विषयात सर्वप्रथम येत सुवर्णपदक प्राप्त करण्याचा बहुमान मिळवला आहे. या यशाबद्दल देवरुख वरची आळीतर्फे तिचा नुकताच भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
गायत्री माधव जोशी हिने पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा नंबर १ मध्ये तर, पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल देवरुख येथे घेतले. बी.एस्सी. गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे गणित विषय घेऊन पूर्ण केले. एम.एस्सी. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कँपसमधून गणित विभागातून पूर्ण केल्याची माहिती गायत्री जोशीने दिली.
गायत्रीची आई मृणाल जोशी ही गृहिणी असून, वडील माधव जोशी देवरुख साडवली येथील एका कंपनीमध्ये सेवेत आहेत. तिच्या या यशात आई-वडिलांसह सर्व मार्गदर्शक शिक्षकांचा मोठा सहभाग असल्याचे गायत्रीने अभिमानाने सांगितले.
३१ जानेवारी रोजी गायत्रीला मुंबई विद्यापीठाच्या विशेष समारंभात सुवर्णपदक देऊन गौरविण्यात येणार आहे.
नेट सेट देणार
गणित हा विषय शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना खूप कठीण वाटतो. मात्र, ज्याचे गणित चांगले त्याला स्वतःच्या आयुष्याचे गणित सोडविणेही सहज शक्य होते. यासाठी आपण नेट सेट परीक्षा देऊन गणित विषयाची प्राध्यापिका बनण्याचा प्रयत्न आहे.
- गायत्री जोशी